Chandwad News : ७७ वर्षांचा संघर्ष यशस्वी! चांदवडच्या वाहेगाव साळमध्ये शेतकऱ्यांना अखेर 'हक्काचा रस्ता' मिळाला
esakal October 14, 2025 01:45 AM

चांदवड: तब्बल ७७ वर्षांनंतर राज्य सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे वाहेगाव साळ गावातील शेतकऱ्यांना अखेर ‘हक्काचा रस्ता’ मिळाला आहे. शासनाने राबविलेल्या शीव पाणंद शेतरस्ता योजनेंतर्गत या रस्त्याचे उद्घाटन प्रशासन आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने करण्यात आले. या घटनेने ग्रामीण भागातील विकासाला नवसंजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्यांच्या संघर्षाचे स्वप्न साकार झाले आहे.

‘शीव पाणंद योजना’ शेतरस्त्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणारी योजना ठरणार आहे. वाहेगाव साळ येथील ग्रामस्थांनी योजनेचे ब्रीदवाक्य ‘हक्काचा रस्ता, प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान’ प्रत्यक्षात उतरवून दाखविले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंद असलेला रस्ता ग्रामस्थांच्या सहकार्याने खुला झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

आपापसातील वाद विसरून तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देत ग्रामस्थांनी एकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे वाहेगाव साळ गावाने संपूर्ण चांदवड तालुक्यासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. ही कार्यवाही तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Thane Traffic: बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन! ठाणे-भाईंदर मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशाने कोंडी

मंडल अधिकारी गणेश शिरसाठ, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र गुंजाळ, महसूल सेवक गायत्री न्याहारकर, तसेच चांदवड पोलिस ठाण्याचे हवालदार वडजे, ज्ञानेश्वर शिंदे, महिला पोलिस कमल अहिरे यांनी या कामात सहभाग घेतला. पोलिसपाटील दीपक खैरे, सरपंच सविता खैरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर, जगन्नाथ शिंदे, आप्पा रसाळ, पोपट शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.