India vs Australia Women’s World Cup 2025highlights: भारतीय महिला संघाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने ३३१ धावांच्या लक्ष्याचा ३ विकेट्स राखून पाठलाग करून गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. त्याचवेळी भारत सलग दोन पराभवामुळे तिसऱ्या स्थानावर अडकला आहे आणि आता आगामी सामन्यांत इंग्लंड व न्यूझीलंड सारख्या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना त्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे यजमान भारत उपांत्य फेरीत पोहोचल की नाही अशी शंका आहे. अशात कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur Reaction ) कालच्या पराभवाचं खापर खालच्या क्रमांकावरील फलंदाजांवर फोडलं आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३० धावा केल्या. प्रतिका रावल ( ७५) व स्मृती मानधना ( ८०) यांनी १५५ धावांची सलामी दिली. त्यानतंर हर्लीन देओल ( ३८), हरमनप्रीत कौर ( २२), जेमिमा रॉड्रीग्ज ( ३३) आणि रिचा घोष ( ३२) यांनी चांगली फलंदाजी केली. पण. ५ बाद २९४ धावांवरून टीम इंडियाचा डाव ३३० धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने ५, तर सोफी मॉलिनेक्सने ३ विकेट्स घेतल्या.
विराट कोहली IPL मधूनही निवृत्ती घेतोय? RCB सोबत 'करार' करण्यास नकार, माजी खेळाडूने कारण समजावून सांगितलं...भारताच्या या आव्हानाला कर्णधार एलिसा हिलीने जोरदार प्रत्युत्तर दिले. हिलीने १०७ चेंडूंत २१ चौकार व ३ षटकार खेचून १४२ धावांची वादळी खेळी केली. फोएबे लिचफिल्डने ४० व एलिसा पेरीने ४७ धावांची खेळी करताना हिलीला साथ दिली. मधल्या फळीत दोन धक्के बसल्यानंतर अॅश्लेघ गार्डनरने खिंड लढवली आणि ४५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत ७ बाद ३३१ धावा केल्या.
या पराभवानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, आम्ही ज्या प्रकारे खेळाला सुरुवात केली, ते पाहता ३०-४० धावा जास्त करता आल्या असत्या. मागील सहा षटकांत आम्हाला धावा करता आल्या नाही आणि त्याचा फटका बसला. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती, परंतु आम्ही सहा षटकांत त्याचा फायदा उचलण्यात अपयशी ठरलो. सलामीच्या जोडीमुळे आम्ही ३०० धावांपर्यंत पोहोचलो.
World Cup Points Table: सलग दुसऱ्या पराभवाने भारताचं टेन्शन वाढलं, ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक विजयासह अव्वल; पाहा कोण कोणत्या स्थानीमागील तीन सामन्यांत मधल्या फळीला योगदान देता आलेले नाही. आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी ती जबाबदारी घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पहिली ४० षटकं चांगला खेळ झाला होता. आता आम्ही कसे पुनरागमन करतो, हे महत्त्वाचे आहे. अशा गोष्टी घडत असतात.. आम्ही बसून चर्चा करू. दोन खराब सामन्यांनी काही फरक पडत नाही.