Aneet Padda In Ramp Walk: सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे आणि सैयारा फेम अभिनेत्री अनित पड्डा या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाली. फिनालेच्या सुरुवातीलाच, अभिनेत्रीने पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आणि उपस्थित असलेल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अनित पड्डाचा ग्लॅमरस गाऊन
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अभिनेत्री अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने चमकदार गाऊन परिधान केला आहे. त्यामुळे तिचा लूक आणखी उठून दिसत आहे. शेवटी, रॅम्प सोडताना, अभिनेत्रीने चाहत्यांना एक फ्लाइंग किस दिला. तिच्या चेहऱ्यावरील हलकेसे हास्य तिला अत्यंत आकर्षक बनवत होते.
Bigg Boss 19: रात्री कपडे बदलणार होती तेवढ्यात...; अभिषेकच्या 'या' वागण्यामुळे अशनूर संतापलीअभिनेत्री शोस्टॉपर बनली
व्हायरल व्हिडिओनुसार, अभिनेत्री अनित पड्डाने लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेची सुरुवात शोस्टॉपर म्हणून केली. सैयारामुळे घराघरात पोहोचल्या या अभिनेत्रीची स्टाईल नेटिझन्सना अभिनेत्रीची खूप आवडली असून सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच तिचा रॅम्प वॉक ट्रेंड करत आहे.
Lakshmi Niwas: जान्हवीची जयंतपासून सुटका, भावना-सिद्धूच्या नात्याची नवी सुरुवात; 'लक्ष्मी निवास'मध्ये येणार 'हे' मोठे ट्विस्टView this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
नेटिझन्सची प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर येताच, नेटिझन्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने म्हटले की, "रॅम्पवर चालण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. ती खरोखरच घाबरली होती, पण तरीही तिने खूप छान वॉक केला, इतर अभिनेत्रींपेक्षा चांगले. आपण तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करायला हवे." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, "तिने खूप चांगले केले, कारण हा तिचा पहिलाच रॅम्प वॉक होता."