ऋषभ शेट्टीचा “कांतारा: चॅप्टर 1” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथेपासून ते त्यातील गाण्यापर्यंत सर्वकाही लोकांच्या पसंतीस उरत आहे. प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिथे चित्रपटातील भव्य-दिव्य सेट तसेच चौथ्या शतकातील संस्कृती याचे अगदी बारकाईने निरिक्षण करून त्यावेळेचा देखावा निर्माण केला होता. पण आता सोशल मीडियावर या चित्रपटाच्या संदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. ती म्हणजे निर्मात्यांकडून झालेली चूक म्हणत नेटकऱ्यांनी थेट एक स्क्रीनशॉटच व्हायरल केला आहे. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
चित्रपटातील या गाण्यात नेटकऱ्यांना दिसली ही चूक
‘कांतारा चॅप्टर 1’ ला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून, विशेषतः त्याच्या कथेसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी, प्रशंसा मिळाली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडले आहेत आणि प्राचीन परंपरा आणि योद्धा भावनेच्या प्रामाणिक चित्रणासाठी प्रशंसा मिळवली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्या भूमिका आहेत. तथापि, नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे “ब्रह्मकलश” मधील एका दृश्यातनिर्मात्यांकडून चूक झाली आहे. ती म्हणजे या गाण्यातील एका दृश्यात पाण्याची मोठी प्लास्टिकची बिस्लरी बाटली दिसत आहे. जे की चौथ्या शतकात असण्याचा संबंधच येत नाही. दरम्याना गाण्यातील ही चूक व्हायरल झाल्यावर त्याचे स्क्रीनशॉट ऑनलाइन व्हायरल होत आहे.
सीनचे स्क्रीनशॉट पोस्ट व्हायरल
प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या सीनचे स्क्रीनशॉट पोस्ट करायला सुरुवात केली आहे आणि त्याला ऐतिहासिक नाटकातील मोठी चूक म्हटले आहे. ब्रह्मकलश गाण्यातील दृश्याने सोशल मीडियावर लक्ष वेधले, अनेक वापरकर्त्यांनी त्याची तुलना “गेम ऑफ थ्रोन्स” मधील एका सामान्य मेजवानीच्या दृश्यादरम्यान अनवधानाने स्टारबक्स कॉफी कप दिसल्याच्या घटनेशी केली आहे.
#KantaraChapter1
Mistake shot plastic water can video song 3:06 pic.twitter.com/xLVIiQcgwR— rio raz🖤 (@razworldd)
कैहींनी किरकोळ चूक म्हटलं, तर काहींनी निराशा व्यक्त केली
ऋषभ शेट्टी आणि चित्रपटाच्या टीमने अद्याप व्हायरल झालेल्या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या चुकीमुळे ऑनलाइन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्ते याला किरकोळ चूक म्हणत आहेत, तर काहींनी निराशा व्यक्त केली आहे, असे म्हणत आहेत की चित्रपटात तपशीलांकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. एका वापरकर्त्याने लिहिले, “त्या प्राचीन काळात लोकांनी पाण्याच्या बाटल्या शोधल्या होत्या का?” दुसऱ्याने पोस्ट केले, “मला नुकतेच कळले की कदंबांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्याचे पहिले साधन होते.”
फोटो एडिट केला गेलाय का?
तर काहीजण फोटो एडिट करून टाकल्याचं म्हणत आहेत. कारण गाण्याच्या या व्हिडीओमध्ये कुठेही ही पाण्याची बाटली दिसत नाहीये. मग फक्त फोटोतच कशी काय दिसत आहे. यावरून हा फोटो मुद्दाम एडिट केल्याचं म्हटलं जात आहे. कारण व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉटमध्येच फक्त ती बाटली दिसत आहे. खऱ्या व्हिडीओमध्ये किंवा त्या फोटोंमध्ये कुठेही ती प्लास्टिकची बाटली दिसत नाहीये.
खाली दिल्याप्रमाणे पहिला फोटो हा गाण्याच्या व्हिडीओमधून काढलेला स्क्रीनशॉट आहे . तर दुसऱ्या बाजूचा फोटो ज्यात बाटली दिसतीये तो व्हायरल झालेला स्क्रीनशॉट आहे. त्यातही काही फरत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता ब्रह्मकलश गाण्यात दिसलेली ही पाण्याची बाटली निर्मात्यांची चूक की एडिटचा घाणेरडा प्रकार आहे हे लवकरच समोर येईल.
Kantara Chapter 1 Blunder
या चुकीमुळे चित्रपटाच्या लोकप्रियतेवर काय परिणाम झाला?
पण या गोष्टीमुळे नक्कीच चित्रपटाच्या लोकप्रियतेवर काहीही परिणाम झाला नाही. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी, ऋषभ आता उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्यास उत्सुक आहे . चित्रपटाच्या निरंतर यशासाठी तो भगवान शिवाचे आशीर्वाद घेताना दिसतो. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 500 ते 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर भारतात 359.40 कोटींची कमाई केली आहे.