भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी दिल्लीमध्ये सुरू आहे.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी सामना सुरू असतानाच प्रेक्षकांमध्ये एक तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या कानाखाली मारताना दिसली.
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीमध्ये सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात मात्र चांगली फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले आहे. त्यांनी १०० धावांहून अधिकची आघाडीही मिळवली आहे.
हा सामना सुरू असताना चौथ्या दिवशी अचानक प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने चक्क तिच्या शेजारी बसलेल्या मुलाच्या कानाखाली मारल्याचे दिसले.
IND vs WI 2nd Test Live: जॉन कॅम्बेलने शतकासह इतिहास रचला! व्हीव्ह रिचर्ड्स, कपिल देव यांच्या पंक्तित बसला; भारताचा डाव फसलाया सामन्यात तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजला फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात सुरुवातीला जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांची चांगली फलंदाजी केली. त्यांनी चौथ्या दिवशी शतकेही पूर्ण केली. दरम्यान हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार रोस्टन चेस आणि यष्टीरक्षक फलंदाज तेविन अमलाच फलंदाजी करत असताना अचानक कॅमेरा स्टेडियममध्ये सामना पाहात बसलेल्या एका मुली आणि मुलावर गेला.
ते दोघेही सुरुवातीला काही तरी बोलताना दिसले, त्यानंतर अचानक त्या मुलीने मुलाच्या दोन वेळा कानाखाली मारली त्यानंतर ती एका हाताने त्याच्या मानेला पकडून रागात दुसऱ्या हाताने काहीतरी दाखवत प्रचंड चिडलेली दिसली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडिओवरून तरी ते दोघेही चांगले मित्र असल्याचे दिसत आहे. मात्र ती मुलगी नेमकी त्या मुलावर का चिडली, हे समोर आलेलं नाही.
तथापि, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव ८१.५ षटकात २४८ धावांवरच संपला. त्यामुळे भारताला २७० धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला. मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचने ११८.५ षटकात सर्वबाद ३९० धावा केल्या.त्यामुळे वेस्ट इंडिजने १२० धावांची आघाडी घेत १२१ धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले.
IND vs WI 2nd Test Live: कुलदीप यादवने १० चेंडूंत विंडीजचे कंबरडे मोडले! २ शतकं होऊनही पाहुणे रडले, शेवटच्या विकेटने भारताला झुंजवलेदुसऱ्या डावात कॅम्पबेलने ११५ धावा केल्या, तर शाय होपने १०३ धावा केल्या. याशिवाय शेवटच्या विकेटसाठी जस्टिन ग्रीव्हज आणि जेडन सिल्स यांनी चक्क ७९ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजची आघाडी वाढवली होती.
भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.