पराग ढोबळे
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला. वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० मतदारांची नोंद यादीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकाच घर क्रमांकावर सुमारे दोनशे मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची आरोप करण्यात आला. नागपूरजिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात हा घोळ समोर आला. राजीव नगर परिसरातील संपत बावनथळे यांच्या घर क्रमांक एक या पत्त्यावर दोनशे मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्या मतदारांची नावे घर क्रमांक १ या पत्त्यावर नोंदणी करण्यात आली आहे. ते मतदारयाच परिसरात विविध ठिकाणी गेली २० ते २५ वर्षांपासून राहत असल्याचं बोललं जातं आहे.
Crime News : किरकोळ वाद जीवावर बेतला; सिमकार्ड चोरल्याचा संशय, सोबत राहणाऱ्या तरुणाकडून वृद्धाची हत्यानागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील वानाडोंगरी नगर परिषदेच्या हद्दीत राहणारे बावनथळे यांचे घर असून संपत बावनथळे यांच्या कुटुंबात पती- पत्नी, दोन मुले आणि सुना असे सहा मतदार आहेत. मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत संपत बावथळे यांच्या घरात अशाच पद्धतीने जवळपास २०० लोकांच्या नावापुढे क्रमांक १ लिहल असल्यानं हे लोक इथं राहत नाही म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिनेश बंग यांनी आरोप केला. तर या भागात राहणाऱ्या एका महिलेने राहत असले तरी माझं आणि माझ्या कुटुंबाचा मतदार यादीत नाव नसल्याचा आरोप केला आहे.
Shegaon Crime : तरुणाला गाडीत डांबून बेदम मारहाण; शेगाव पोलिसांनी भाईगिरी उतरविली, परिसरातून काढली धिंडआमदार मेघेंनी आरोप फेटाळले
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी केलेले आरोप हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी फेटाळले आहेत. तर ही प्रशासकीय बाब असून याची चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे; अशी मागणी हिंगण्याचे भाजप आमदार समीर मेघे यांनी केली आहे.
सदरची प्रारूप मतदार यादी आहे. ज्यांची घरे अतिक्रमण ठिकाणी असतात किंवा ज्यांचा पत्ता स्थायी नसतो. त्यांना 'शून्य एक' हा घर क्रमांक देण्यात येतो. तसेच हा घर क्रमांक मालमत्ता क्रमांक नाही. शिवाय या मतदार यादीवर आक्षेप घेण्याची मुदत दिली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.