वेत्ये येथील मगर अखेर वनविभागाकडून जेरबंद
esakal October 14, 2025 10:45 AM

98265
वेत्ये ः वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेली मगर.

वेत्ये येथील मगर अखेर
वनविभागाकडून जेरबंद
सावंतवाडी, ता. १३ ः वेत्ये कलेश्वर मंदिरालगत ओहोळात गेले काही दिवस वास्तव्य करून असलेल्या १२ फुटी महाकाय मगरीला रविवारी (ता. १२) वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने जेरबंद केले. या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गेले काही दिवस ही महाकाय व धोकादायक मगर या परिसरात आढळत होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे केली होती. अखेर रविवारी दुपारी चारच्या सुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, आनंद राणे, प्रथमेश गावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने या मगरीला जेरबंद करून अधिवासात सोडले. यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, जितेंद्र गावकर, बाळू गावकर, बाळू गावडे आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.