सोलापूर : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी (ता. १५) मुंबई विमानतळावर होणार आहे. शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत. मुंबईहून येणारे विमान सलग दोन्ही दिवस फुल्ल असून पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विमानसेवेच्या स्वागताची तयारीही विमानतळावर पूर्ण केली आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!मुंबई विमानतळावरील कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. बुधवारी दुपारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून पहिली फ्लाईट सोलापूर विमानतळावर येणार आहे. यावेळी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यानंतर कंपनीकडून सर्वच प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे. विमानाच्या स्वागताला नाशिक ढोल पथक असेल.
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा बुधवारी शुभारंभ होत असल्याने स्टार कंपनीकडून बुकिंग काउंटरही सुरू करण्यात आले आहे. विमानतळावर मंडप उभारण्यात आला आहे. याचठिकाणी छोटेखानी उद्घाटन व प्रवाशांचा स्वागत सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर स्टार कंपनीचे ब्रॅंडिंगही करण्यात आले आहे.
तिकीट विक्रीस चांगला प्रतिसाद...१५ ऑक्टोबर रोजी सोलापूर ते मुंबईसाठी फ्लाईट फुल्ल झाली आहे. १७ रोजीही ४० हून अधिक जणांनी बुकिंग केले आहे. २८ ऑक्टोबर रोजी ३५ तर, २९ ऑक्टोबर रोजीही ४५ जणांनी बुकिंग केले आहे. मुंबई ते सोलापूरसाठी पहिले दोन्ही दिवस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
वेळेत बदल करण्याची मागणीमुंबईत कामासाठी व मुंबईतून काम उरकून परत येण्यासाठी फ्लाईटची वेळ गैरसोयीची आहे. यामुळे मुंबईला जाण्यासाठी सकाळची तर परत सोलापूरला येण्यासाठी सायंकाळी फ्लाईट उपलब्ध झाल्यास मोठा प्रतिसाद मिळेल, अशी सोलापूरकरांची मागणी आहे. या मागणीचाही विचार करू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.
UPSC Success Story:'यूपीएससी परिक्षेत डिस्कळच्या दीपालीचा राज्यात डंका';आयएसएस अधिकारीपदी निवड; दोन्ही जुळ्या बहिणींचे सुयश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवाळीचे किटवाटप...विमानतळावरच छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला असून किट वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांसाठी नियोजन समितीमधून दिवाळी सणासाठी किट वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना भाऊबीज वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.