ठळक मुद्दे (Highlights):
स्पीडब्रेकरवरून मोटारसायकल घसरल्याने अपघात:
पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील सत्यजित जयवंत मिसाळ (वय २४) हा युवक शेताकडे भात कापणीसाठी जात असताना स्पीडब्रेकरवरून मोटारसायकल घसरून पडला.
डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू:
अपघातात तो जोरात रस्त्यावर आपटल्याने डोक्याला गंभीर मार लागला होता. गडहिंग्लज येथील रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मनमिळावू व हुशार तरुणाचा मृत्यू:
सत्यजित हा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, सार्वजनिक कामात सक्रिय आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला तरुण होता. त्याच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
Kolhapur Bhudargad Accident : पिंपळगाव (ता. भुदरगड)येथील सत्यजित जयवंत मिसाळ (वय २४) या महाविद्यालयीन युवकाचा शेताकडे भात कापणीसाठी जात असताना मोटारसायकल स्पीडब्रेकरवरून घसरून पडल्याने मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सत्यजित हा शेताकडे भात कापणीसाठी मोटरसायकलवरून जात होता. वाटेत अचानक मोटारसायकल रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवरून घसरल्याने गाडीवरून जोरात रस्त्यावर आपटला गेला. जोराने दगडावर पडल्यामुळे डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याला तत्काळ गडहिंग्लज येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. डोक्यास गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
Kolhapur Sister Harassment : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणास एडक्याने मारहाण, कोल्हापुरातील धक्कादायक घटनासत्यजित हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने साऱ्या गावातील सार्वजनिक कामांमध्ये मिळून मिसळून असायचा. तो शाळेतील हुशार मुलगा होता. त्याने बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ अजय चुलते असा परिवार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
प्र.१: अपघात कुठे झाला?
उ. हा अपघात पिंपळगाव (ता. भुदरगड) परिसरात, शेताकडे जात असताना झाला.
प्र.२: अपघाताचे कारण काय होते?
उ. रस्त्यावरील स्पीडब्रेकरवरून मोटारसायकल घसरल्याने सत्यजित रस्त्यावर पडला आणि डोक्याला गंभीर इजा झाली.
प्र.३: मृत तरुणाचे वय आणि नाव काय आहे?
उ. मृत युवकाचे नाव सत्यजित जयवंत मिसाळ (वय २४) असून तो पिंपळगाव येथील रहिवासी होता.
प्र.४: त्याचा परिवारात कोण कोण आहे?
उ. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ अजय आणि चुलते असा परिवार आहे.