न्यूयॉर्क : शांततेच्या नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला.
ट्रम्प म्हणाले की त्यांनी हे कार्य नोबेल पुरस्कारासाठी नव्हे, तर जागतिक शांततेसाठी केले. यापूर्वी सात युद्धे थांबविल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी इस्राईल-गाझा संघर्ष थांबविण्याचे श्रेयही आपल्याकडे घेत थांबविलेल्या युद्धांची संख्या आठवर नेली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष थांबविण्याचेही सूतोवाच केले. ते म्हणाले, की मी आठ युद्धे थांबविली असून आता पाकिस्तान व अफगाणिस्तानात संघर्ष सुरू झाला आहे.
मी आणखी एक युद्ध थांबविणार आहे. शांतता प्रस्थापित करण्यात माझी कामगिरी चांगली आहे. बहुतेक संघर्ष मी अवघ्या एका दिवसातच थांबविले आहेत. लाखो जणांचे जीव वाचविले आहेत. भारत व पाकिस्तानचा विचार करा.
Donald Trump: सात युद्धे थांबविली, मला नोबेल द्या : डोनाल्ड ट्रम्पवर्षानुवर्षे सुरू असलेल्या काही युद्धांचा विचार करा. एक युद्ध ३१ वर्षे, ३२, ३७ वर्षे सुरू आहे, प्रत्येक देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मी एका दिवसांतच युद्धे थांबविली आहेत.