rat14p5.jpg-
98440
संगमेश्वरः एसटी अचानक बंद झाल्याने कोंडये ग्रामस्थांची एसटी आगारावर धडक.
-----------
कोंड्ये एसटी बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
ग्रामस्थ धडकले संगमेश्वर बसस्थानकात ; अधिकारी धारेवर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ः विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा चालू असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता सलग दोन दिवस एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने कोंड्ये ग्रामस्थांनी संगमेश्वर बसस्थानकावर धडक दिली.
या गैरकारभाराबाबत कोंड्ये सरपंच महेश देसाई म्हणाले, आम्ही देवरूख आगारात जाऊन आगार व्यवस्थापक मधाळे यांच्याकडे निवेदन देत या ढिसाळ कारभाराबाबत कानउघडणी केली. त्यामध्ये अचानक एसटी सेवा बंद करणे, सदर गाडीचे सुरवातीपासूनच कोंड्ये असे नाव होते, ते बदलण्यात आले. याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यासाठी ग्रामपंचायत व शिवसह्याद्री प्रतिष्ठान मंडळाच्यावतीने नवीन बोर्ड देण्यात आला होता. ही गाडी कलकदेकोंडपर्यंत पूर्ववत चालू व्हावी म्हणून विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे सुरेश दसम यांनी थांब्याप्रमाणे तिकीट मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांना ज्यादा तिकिटाचे पैसे मोजावे लागतात, असे सांगितले. यावर महेश देसाई यांनी थांब्याचे आदेश हे प्रत्येक वाडीप्रमाणे केले होते, मग पुढील थांब्याचे तिकीट ग्राहकांना का देता0 असा सवाल केला. त्यावर तत्काळ त्याच्यात बदल होईल, असे सांगण्यात आले तसेच गाडी वेळेत येण्यासाठीही समज देण्यात आली.
कोंड्ये ग्रामपंचायत सरपंच महेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य सुरेश दसम, उपसरपंच वैशाली दसम यांच्यावतीने विश्वास दसम, ग्रामपंचायत सदस्य बंड्या शिंदे, मधलीवाडीचे अर्जुन बाल्ये, रवींद्र पालांडे यांनी तत्काळ संगमेश्वर बसस्थानकात भेट देऊन त्यांना जाब विचारत विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. सतत जनतेला होणाऱ्या गैरसोयीबाबत योग्य ती समज दिली.