Government Scheme For Farmers Relief : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; विहीर दुरुस्ती आता सोपी! बीडीओंना मंजुरीचे अधिकार, जाणून घ्या लागणारी कागदपत्रे
Sarkarnama October 15, 2025 02:45 PM
राज्यात अतिवृष्टी

राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे सिंचन विहिरींना मोठा फटका बसला आहे. तब्बल 11 हजाराहून अधिक विहिरींचे नुकसान झाले असून, गाळाने विहिरी बुजून गेल्या आहेत.

'बीडीओ'कडे जबाबदारी

या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) दिले आहेत. यामुळे विहिरी दुरुस्तीच्या कामांना वेग मिळणार आहे.

दुरुस्तीसाठी देण्यात येणार रक्कम

तसेच, दुरुस्तीचा एकूण खर्च शेतकऱ्याला अधिक सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आगाऊ स्वरूपात 50 टक्के रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आता विहीर दुरुस्ती करणे झाले सोपे आणि जलद!

अर्जासाठी काय लागेल?

विहिरीची नोंद असलेला सातबारा उतारा जोडून लेखी अर्ज करणे बंधनकारक.

अर्जाची खात्री करा

अर्ज स्वीकारल्याची पोचपावती अधिकारी तत्काळ देतील.

स्थळपाहणी व अंदाजपत्रक

स्थळपाहणीच्या 7 दिवसांत दुरुस्तीचे अंदाजपत्रक बीडीओंकडे द्या.

खर्चाचे प्रमाण

जिल्हाधिकारी कमाल 30,000 रुपयांपर्यंत खर्चास मान्यता देतील.

उर्वरित रक्कम मिळविणे

काम पूर्ण झाल्यावर उर्वरित रक्कम शेतकऱ्याला दिली जाईल. तसेच कामात पारदर्शकता राखण्यासाठी दुरुस्त केलेल्या विहिरींचे ''जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे.

Next : 51 कोटींचा दंड 4 हजारांवर; प्रसिद्ध IAS अधिकारी चर्चेत येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.