टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. अन्य स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळताना दिसतील. रणजी ट्रॉफी स्पर्धेला आज बुधवार 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात होत आहे. यात एकूण 38 टीम सहभागी होणार आहेत. या टुर्नामेंटच्या पहिल्या राऊंडमध्ये एकूण 19 सामने खेळले जातील.दुसऱ्या राऊंडमध्ये 138 सामने होतील. पण या टुर्नामेंटला सुरुवात होण्याआधी मुंबईच्या टीमला झटका बसला आहे. टीमचा एक स्टार खेळाडू टुर्नामेंटची पहिली मॅच खेळू शकणार नाहीय.
ऑलराऊंडर शिवम दुबे रणजी ट्रॉफी सामन्याआधी टीमच्या बाहेर गेला आहे. श्रीनगरमधील थंडीमुळे त्याची कंबर आकडली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर विरुद्ध पहिल्या सामन्यात तो मुंबईकडून खेळू शकणार नाहीय. टीम मॅनेजमेंटने दुबेला आरामाचा सल्ला दिला आहे. शिवम दुबे मुंबई टीमसोबत श्रीनगरला गेला होता. तिथे मॅच आहे. मेडीकल टीमच्या सल्ल्यानंतर तो पुन्हा मुंबईला परतलाय. शिवम दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. लेफ्टी बॅटिंग करणाऱ्या शिवम दुबेमध्ये लांब लांब षटकार मारण्याची क्षमता आहे.
मुंबईच्या टीमला बसलेला धक्का
बुधवारपासून सुरु होणाऱ्या या सामन्यात शिवम दुबेची अनुपस्थिती मुंबई टीमसाठी झटका आहे. खासकरुन मागच्या सीजनमध्ये टीम प्लेऑफ मधून बाहेर गेलेली. एलीट ग्रुप डी मध्ये मुंबईला हैदराबाद, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, पॉन्डिचेरी, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर सारख्या मजबूत टीम्सचा सामना करायचा आहे. मागच्यावर्षी जम्मू-कश्मीर टीमने मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून सर्वांना धक्का दिला होता. आता शार्दुल ठाकुरच्या कॅप्टनशिपखाली मुंबईची टीम त्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करेल.
भारताच्या टी 20 टीमचा भाग
शिवम दुबेची भारताच्या टी 20 टीममध्ये निवड झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज होईल. अपेक्षा आहे की शिवम दुबे लवकर फिट होईल. 23 ऑक्टोंबरला त्याला भारतीया टीम सोबत ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचं आहे. शिवम दुबे अलीकडेच आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. या टुर्नामेंटमध्ये त्याने चांगलं प्रदर्शन केलं.