Jeevansathi Scam : "मंत्रालय, पोलिस दलातील अधिकारी माझ्या ओळखीचे...", कोकणातल्या बनावट पोलिसाने तरुणींना घातला गंडा
Saam TV October 15, 2025 07:45 PM
  • बनावट पोलीस बनून तरुणाने जीवनसाथी ॲपवरून ६० तरुणींना फसवलं

  • नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला

  • सोलापूर सायबर पोलिसांनी मुंबईतून आरोपीला अटक केली आहे

  • आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सोलापूरमधून धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट खाकीचा माज दाखवत एका तरुणाने जीवनसाथी ॲपवरून अनेक तरुणींना फसवल्याची घटना घडली आहे. या तरुणाने नोकरीला लावतो तसेच लग्नाचं आमिष दाखवत राज्यातील वेगवेगळ्या भागातील ६० तरुणींना गंडा घातला आहे. या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपी तरुणाचं नाव वैभव नारकर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोविळ मधला असून तो मुंबईतील नायगावमध्ये राहत होता. त्याने सोलापुरातील एका तरुणीशी ओळख करून तिच्याशी मैत्री केली आणि बोलणे सुरू केले. काही दिवस गेल्यावर त्याने १९ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात त्या मुलीकडून त्याने मावस भाऊ व मावशीचा अपघात झाला असून ते मयत झाल्याचे सांगून ६३ हजार रुपये लुबाडले. त्या मुलीच्या तक्रारीनंतर सोलापूर शहर सायबर पोलिस त्याचा शोध घेत होते.

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

याशिवाय वैभवने जीवनसाथी ॲपवरून सात-आठ मुलींना विवाह करतो म्हणून लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्याकडूनही त्याने पैसे उकळल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय त्याने ४० ते ५० मुलांशी संपर्क करून नोकरीचे आमिष दाखविले होते. मंत्रालय, पोलिस दलात मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून त्याने त्यांना नोकरीचे आमिष दिले होते. त्यांच्याकडूनही संशयिताने लाखो रुपयाला गंडा घातल्याची बाब तपासात समोर आली आहे.

Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस अंमलदार कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, नितीन आसवरे, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने संशयिताला मुंबईतून अटक केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.