आपटाळे, ता. १४ ः इनामवाडी-कुसूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आला. ‘‘स्वच्छ पाणी, निरोगी जीवन’’ या उद्देशाने झायलो टीम आणि प्लॅनेट वॉटर फाउंडेशन यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, आरोग्यविषयक जाणीव वाढविण्यात मदत होईल असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर व झायलो टीमचे प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी झायलो टीमच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे व मुख्याध्यापिका सुमन उतळे यांच्याकडे या प्रकल्पाचे हस्तांतर प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी सहायक गटविकास अधिकारी भोईर व गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. झायलो टीमचे राजेश उंडे, स्मिता पोकळे, मंतेश कत्ती, शिवा वारीगला, अमेय उंडे, कुंवरसिंह, राम कुलकर्णी, संतोष तोडकरी, भालचंद्र देशमुख, गुरुनाथ जोशी, प्लॅनेट वॉटर फाउंडेशनचे अभिषेक सोनकांबळे, चैतन्य कुसुरकर, रामदास जाधव, सरपंच दत्तात्रेय ताजणे, उपसरपंच रमेश काळे, राजेंद्र भगत, सदाशिव ताजणे, रामदास काळे, निवृत्ती दिवटे, सविता उगले, अनामिका मोढवे यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.