विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई तालुका पंचायत समितीचे आरक्षण मंगळवारी (ता. १३) जाहीर झाले. या पंचायत समितीवर यापूर्वी बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. आरक्षणामध्ये दहापैकी पाच जागांवर महिलाराज असणार आहे. वसई तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षणात चार जागांवर अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत.
पंचायत समितीच्या आरक्षणात चार जागा सर्वसाधारणसाठी, तर नागरिकांच्या मागास वर्गासाठी दोन जागा असणार आहेत. वसई पंचायत समितीसाठी भाताणे, सकवार हे गण अनूसुचित जमाती महिला, तर चंद्रपाडा येथे सर्वसाधारण महिला, तिल्हेर गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. अर्नाळा आणि कळंब येथे सर्वसाधारण, तर अर्नाळा किल्ला येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, वासलई येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निवडून येणार आहे.