Entertainment News : भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची लोकप्रियता जगभरात होती. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास सगळ्याच भारतीय भाषेतील गाणी गेली. त्यांनी त्यांच्या हयातीत 50,000 हुन अधिक गाणी गायली आहे. त्यांच्या या विक्रमाचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.
आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. वडिलांच्या अकाली निधनानंतर फार कमी वयात त्यांच्या खांद्यावर कुटूंबाची जबाबदारी येऊन पडली. त्यात त्या इतक्या गुरफटून गेल्या की पुढे त्यांच्या लग्नाला उशीर झाला. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात खरं प्रेम आलं तेव्हाही त्यांना विरहच सहन करावा लागला.
लता यांच्या आयुष्यात आलेली व्यक्ती आहे माजी राजस्थानी क्रिकेटर राज सिंह डुंगरपूर. ते राजघराण्यातून होते. बिकानेरच्या राजकुमारी राजश्री कुमारी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात पॅलेस ऑफ क्लाउड्स अ मेमॉयरमध्ये लता आणि राज यांच्या नात्याचा उल्लेख केला आहे. लता यांचे धाकटे बंधू हृदयनाथ हे राज यांचे मित्र होते. ते क्रिकेटचे शौकीन आहेत आणि त्यांची राज सिंह यांची ओळख करून दिली.
राज सिंह हे डुंगरपूर या राजस्थानमधील संस्थानाचे राजे महारावल लक्ष्मण डुंगरपूर यांचे धाकटे पुत्र होते. 1956 मध्ये ते त्यांची पदवी पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख हृदयनाथ यांच्याशी झाली. त्यानंतर अनेकदा राज सिंह हे हृदयनाथ याना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात, तेव्हा लता यांच्याशीही गाठभेट व्हायची आणि त्यांचीही चांगली मैत्री झाली. पुढे जाऊन ते प्रेमात पडले.
जेव्हा राज यांचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा ते त्यांच्या संस्थानात परत गेले आणि त्यांनी लता यांच्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांच्या आई-वडिलांसमोर व्यक्त केली. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला कारण लता कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नव्हत्या. त्या दोघांनी त्यांच्या कुटूंबाला समजावण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्यांना परवानगी मिळाली नाही अखेर त्या दोघांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
अखेरपर्यंत ते एकमेकांच्या संपर्कात होते. एकमेकांचे चांगले मित्र होते. 2009 मध्ये राज सिंह डुंगरपूर यांचं निधन झाल्यावर लता या अंत्यदर्शनासाठी डुंगरपूरला आल्याचंही म्हटलं जात.
Video : पार्थचा जीव जाणार ? नंदिनीचा आक्रोश आणि काव्याची धडपड; प्रोमो पाहून प्रेक्षक हादरले