Israel And Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिने या दोघांमध्ये शांतता करार झाला आहे. याच कराराचा पहिला टप्पा म्हणून हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली आणि इस्रायलने पॅलेस्टिनी नागिकांची सुटका केली आहे. हे युद्ध थांबल्यामळे संपूर्ण जगाने त्यांचे अभिनंदन केले आहे. असे असतानाच आता एकीकडे युद्ध थांबलेले असताना दुसरीकडे मात्र हमासकडून कथितपणे हल्ले केले जात आहेत. तसा दावा इस्रायली सैन्यान केले आहे.
मिळालेलया माहितीनुसार इस्रायली सैन्यावर काही संशयास्पद लोकांनी इस्रायल-गाझा यांच्यात असलेली यलो लाईन पार करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा दावा इस्रायली सैन्याने केल आहे. “आज सकाळी अनेक संदिग्ध लोकांनी पिवळी लाईन पार करण्याचा प्रयत्न केला. हे लोक उत्तर गाझा परिसरात इस्रायली सैन्याच्या दिशेने येत होते. शांती कराराचे हे थेट उल्लंघन आहे. इस्रायली सैन्याने या संदिग्धांनी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनी इस्रायली सैनिकांककडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संभाव्य धोका परतवून लावण्यासाठी इस्रायली सैन्यानेही गोळीबार चालू केला,” असे इस्रायली लष्कारने सांगितले आहे. तसेच इस्रायली सैनिकांच्या तळांवर घुसखोरी झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. गाझा पट्टीतील लोकांनी इस्रायली सैनिकांपासून दूर राहावे तसेच नियमांचे पालन करावे, असे आवाहनही इस्रायली सैन्याने केले आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ला केला. पुढे युद्ध भडकले. गाझा पट्टीत आतापर्यंत 67 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार झाला आहे. असे असले तरी अजूनही हमासचे निशस्त्रीकरण, गाझावरील सत्ता तसेच पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता असे काही प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे सध्या घडवून आणलेली शस्त्रसंधी ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. हा कायमस्वरुपी उपाय नाही. असे असताना इस्रायल-हमास यांच्यात कोणता तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.