वुमन्स वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी कसं असेल समीकरण, भारतासह 8 संघांना अशी संधी
GH News October 14, 2025 11:12 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने सुरु आहेत. प्रत्येक सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित बदलताना दिसत आहे. सध्याची गुणतालिका पाहिली तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि भारत हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण हे चित्र कधीही बदलू शकतं. कारण अद्याप कोणत्याही संघाचं काहीच ठरलेलं नाही. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळत आहेत आणि साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 7 सामने खेळणार आहेत. त्यामुळे काही संघांनी 4, तर काही संघांनी 3 सामने खेळले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत चुरस वाढणार आहे.

  • ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत 7 गुणांसह आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय, तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे 3 तीन सामने शिल्लक असून 6 गुणांची कमाई करू शकतात. म्हणजेच हे तिन्ही सामने जिंकले तर 13 गुण होतील. यासह उपांत्य फेरीत जागा पक्की होईल. ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले तरी जागा निश्चित होईल.
  • इंग्लंडने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या इंग्लंडचे 6 गुण असून चार सामने शिल्लक आहे. त्यामुळे इंग्लंडकडे 14 गुण कमवण्याची संधी आहे. इंग्लंडने चार पैकी 3 सामने जिंकले तर स्थान पक्कं होईल. दोन सामने जिंकले तरी काठावर उपांत्य फेरी गाठेल, पण नेट रनरेट अडचणीचा ठरेल.
  • दक्षिण अफ्रिकेने चार सामन्यात 6 गुणांची कमाई केली असून उर्वरित तीन सामन्यात आणखी 6 गुण कमवू शकते. तीन सामने जिंकले तर 12 गुण होतील. तसेच उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. तीन पैकी एक सामना गमावला तरी उपांत्य फेरीत जागा मिळू शकते. पण नेट रनरेटचं गणित महत्त्वाचं ठरेलं.
  • भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. तरच 10 गुण होतील. म्हणजेच प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. एका सामन्यात पराभव झाला तर जर तर वर गणित येईल.
  • न्यूझीलंडने तीन सामने खेळले असून दोन गमावले आहेत. त्यामुळे 2 गुणच आहेत. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 10 गुण होतील. एकही सामना गमावला तर उपांत्य फेरीचं गणित फिस्कटू शकते.
  • बांग्लादेशने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात फक्त एका सामन्यात विजय मिळवला असून 2 गुण आहेत. उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण होतील. पण असं असूनही उपांत्य फेरीचं गणित जर तर वर असेल. त्यात एक आणखी सामना गमावला तर पत्ता कट होईल.
  • श्रीलंकेने सध्या तीन पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ झाल्याने 1 गुण पदरात पडला आहे. आता उर्वरित 4 सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण मिळतील. म्हणजेच 9 होतील. पण येथेही जर तरच गणित म्हणजेच इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
  • पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर 8 गुण होतील. त्यामुळे एका सामन्यात पराभव आणि पत्ता कट अशी स्थिती आहे. आताच स्थिती जर तरवर आहे. पुढे हे गणित सामन्यातील पराभवामुळे संपुष्टात येईल.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.