ICSI Recruitment 2025: CA-CS विद्यार्थ्यांसाठी करिअरची सुवर्णसंधी! ICSI मार्फत कॉर्पोरेट मंत्रालयात थेट भरती सुरू, जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया
esakal October 15, 2025 12:45 AM

थोडक्यात:

  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासाठी ICSI मार्फत CA, CS, CMS विद्यार्थ्यांसाठी 145 पदांसाठी थेट भरती सुरू आहे.

  • या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नाही, फक्त मेरिटच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  • यंग प्रोफेशनल्ससाठी ७५,००० पासून तर असिस्टंटसाठी ४०,००० पासून सुरू होणारा आकर्षक पगार दिला जाईल.

  • CA CS Job Vacancy 2025: जर तुम्ही CA-CS विद्यार्थ्यां असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासाठी (Ministry of Corporate Affairs) भारतीय कंपनी सचिव संस्थान (ICSI) मार्फत यंग प्रोफेशनल आणि असिस्टंट यंग प्रोफेशनल १४५ पदांसाठी भरती सुरू आहे.

    ही संधी खास करून CA, CS आणि CMS उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, फक्त निवड मेरिटच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी www.icsi.edu या वेबसाईटवर ३० ऑक्टोबर २०२५ च्याआधी अर्ज करावे. अधिक माहितीसाठी ICSI Young Professional Recruitment 2025 Notification PDF डाउनलोड करू शकतात.

    Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या! पात्रता काय आहे?

    यंग प्रोफेशलसाठी

    उमेदवारांनी CA / CS / CMS (ICAI / ICSI / ICMAI) मधून पदवी घेतलेली असावी

    चांगले संवाद कौशल्य आणि टेक्नॉलॉजीचे ज्ञान आवश्यक आहे.

    असिस्टंट यंग प्रोफेशनलसाठी

    संबंधित कोर्सचे इंटरमिजिएट किंवा एक्झिक्युटिव्ह परीक्षा उत्तीर्ण असावी.

    कम्युनिकेशन व टेक्निकल स्किल्स देखील असाव्यात.

    पगार

    यंग प्रोफेशल

    पहिल्या वर्षी : ७५,००० (प्रतिमहिना)

    दुसऱ्या वर्षी : ८०,००० (प्रतिमहिना)

    तिसऱ्या वर्षी : ८५,००० (प्रतिमहिना)

    असिस्टंट यंग प्रोफेशनल

    पहिल्या वर्षी : ४०,००० (प्रतिमहिना)

    दुसऱ्या वर्षी : ४२,००० (प्रतिमहिना)

    तिसऱ्या वर्षी : ४५,००० (प्रतिमहिना)

    Kidney Health Tips: सतत मूत्रपिंडाचा त्रास होतोय? मग 'या' ७ सवयी आजच बदला, नाहीतर आरोग्यवर होईल गंभीर परिणाम अर्ज कसा करावा?

    अधिकृत वेबसाइटवर जा: www.icsi.edu

    Recruitment/Jobs विभागात संबंधित भरतीची लिंक निवडा

    अर्जामध्ये तुमची मुलभूत माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वगैरे तपशील भरा

    फोटो आणि सही स्कॅन करून योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा

    सर्व माहिती नीट तपासा आणि शेवटी Submit करा

    भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी वेबसाइट नियमित पाहा

    FAQs

    1. ही भरती कोणासाठी आहे? (Who is eligible for this recruitment?)

    ही भरती केवळ CA, CS किंवा CMS (ICAI, ICSI, ICMAI) विद्यार्थी व पदवीधारकांसाठी आहे.

    2. या भरतीसाठी परीक्षा असणार का? (Is there any exam for this recruitment?)

    नाही, उमेदवारांची निवड फक्त मेरिटच्या आधारे केली जाईल.

    3. पगार किती असेल? (What is the salary offered?)

    यंग प्रोफेशनलसाठी ७५,००० ते ८५,००० पर्यंत, आणि असिस्टंटसाठी ४०,००० ते ४५,००० पर्यंत पगार आहे.

    4. अर्ज कसा करायचा? (How to apply for the recruitment?)

    उमेदवारांनी www.icsi.edu या वेबसाइटवर जाऊन Recruitment विभागातील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.