अमेरिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने धक्कादायक खुलासा केला. भारत आणि दक्षिण आशियावरील प्रसिद्ध तज्ज्ञ अॅशले टेलिस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. गोपनीय माहिती चीनला देत त्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका देखील केल्या. हेच नाही तर आतापर्यंत ते वारंवार चीनच्या अधिकाऱ्यांना भेटत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या घरात काही हैराण करणारी कागदपत्रे देखील मिळाली आहेत. परराष्ट्र विभागात वरिष्ठ सल्लागार आणि युद्ध विभागात कंत्राटदार म्हणून काम करणारे टेलिस यांच्या व्हर्जिनियातील घरात बेकायदेशीरपणे अति महत्वाची आणि अत्यंत गुप्त अशी काही कागदपत्रे आढळून आली आहेत.
अॅशले टेलिस यांच्या घराची झडती घेतली असता ‘टॉप सिक्रेट अँड सिक्रेट’ असे लिहिलेले एक हजाराहून अधिक कागदपत्रे मिळाली. यापेक्षाही खळबळजनक बाब म्हणजे यामध्ये अमेरिकन हवाई दलाच्या क्षमता, शस्त्रास्त्र प्रणाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धोरणात्मक तंत्रज्ञानाची माहिती असलेले कागदपत्रे आढळली आहेत. यामुळे आता अमेरिकेची सुरक्षा यंत्रणात धास्तावली आहे.
12 सप्टेंबर 2025 रोजी टेलिस यांनी त्यांच्या सहकाऱ्याला काही कागदपत्रे मागितली. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी त्यांनी लष्करी विमान क्षमतांचे अमेरिकन हवाई दलाचे कागदपत्रे प्रिंट काढून घेतली. त्यामुळेच त्यांच्यावरील संशय वाढत गेला आणि ते सुरक्षा यंत्रणेच्या संशयाच्या भोवऱ्यात आले. अहवालानुसार, टेलिस गेल्या काही वर्षांत अनेक वेळा चिनी अधिकाऱ्यांशी भेटले. व्हर्जिनियामधील एका रेस्टॉरंटमध्ये चिनी अधिकाऱ्यांसोबत ते यापूर्वी भेटले.
हेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान त्यांच्या हातामध्ये एक लिफाफा देखील होता. त्या लिफाफ्यात नेमके काय होते, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. आता त्याबद्दल तपास केला जातोय. 11 एप्रिल 2023 रोजी चिनी अधिकारी इराण चीन संबंध आणि नवीन उदयोन्मुख लष्करी तंत्रज्ञानावर चर्चा त्यांनी केली. या प्रकरणाबद्दल न्याय विभागाने म्हटले की, टेलिसवर राष्ट्रीय संरक्षण माहिती बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
मुळात म्हणजे टेलिस हे 2001 पासून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात कार्यरत आहेत. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यावर सल्ला देण्यासाठी वारंवार त्यांना बोलावले जाते. भारतावरील एक मान्यताप्राप्त तज्ञ ते बनले. टेलिस यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या घरात मिळालेल्या कागदपत्रांमुळे अमेरिकेची झोप उडालीये. एफबीआय आणि युद्ध विभागाचे पथक टेलिस यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाची कोणती माहिती चीनला दिली, याचा तपास करत आहेत. खरोखरच कोणती संवेदनशील माहिती देण्यात आली का? याबद्दल अजून काही खुलासा होऊ शकला नाहीये.