नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट हे आमच्यासारख्या प्रशिक्षक किंवा विविध संघात खेळणाऱ्या खेळाडूंचे नसून ते आपल्या सगळ्यांचे आहे. भारतीय क्रिकेट प्रगती करत राहावे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी म्हणून कोणी कोणा खेळाडूवर वैयक्तिक टीका करत असेल, नेम धरून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते लज्जास्पद आहे, अशा शब्दात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी माजी कर्णधार कृष्णामाचारी श्रीकांत यांच्यासह टीकाकारांना सुनावले.
हर्षित राणाला भारताच्या तिन्ही प्रकारात स्थान मिळाल्यावरून श्रीकांत यांनी बोचरी टीका केली होती. यावर मत व्यक्त करताना गंभीर म्हणाले. खराब कामगिरी केली तर त्याच्यावरून टीका जरूर करा. त्याच्याकडे लक्ष द्यायला निवड समिती आणि प्रशिक्षक आहेत. खराब कामगिरी केली संघाने, तर मला लक्ष्य करून टीका करा, मी ते हाताळू शकतो, पण तरुण खेळाडूचे मनोधैर्य खच्ची करायला आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायला बोलू नका.
दिल्ली कसोटी पाच दिवस चालली आणि विंडीज संघाने खासकरून दुसऱ्या डावात चांगली लढत दिली याचे समाधान गंभीर यांनी व्यक्त केले. क्रिकेट जगताला वेस्ट इंडीज क्रिकेटची गरज आहे. त्यांचा संघ नवखा आहे म्हणून त्यांना गाडी रुळावर आणायला थोडा वेळ द्यायला हवा, गंभीर यांनी मत सांगितले.
शुभमन गिलने सर्वात मोठी परीक्षा इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिली. गिल नुसता चांगली फलंदाजी करून धावा करत नाहीये, तर तो ड्रेसिंग रूममध्ये योग्य गोष्टी बोलून संघाला योग्य दिशेला घेऊन जायला पावले उचलत आहे. खूप कठीण आहे भारतीय संघाची कप्तानी करणे कारण सतत तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असते, असे गंभीर यांनी गिलचे कौतुक करताना सांगितले. गिलने कठीण काळात शांत राहून चांगला खेळ करायची, संघाला मार्गदर्शन करायची हिंमत दाखवली आहे. तो तरुण आहे, जबाबदार आहे म्हणूनच त्याला कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करायची जबाबदारी दिली गेली आहे, असेही गिलबाबत बोलताना गंभीर म्हणाले.
रोहित, विराटचा फायदाचभारतीय संघ आता एकदिवसीय सामने खेळायला ऑस्ट्रेलियाला जाणार आहे आणि त्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. त्यांच्या भविष्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाले, दोघे अत्यंत अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू आहेत. ते २०२७च्या विश्वचषक स्पर्धेत खेळतील का नाही हे काळच ठरवेल. स्पर्धेला खूप वेळ आहे. मी वर्तमानाचा विचार करत असतो. तेव्हा रोहित, विराटच्या फलंदाज म्हणून क्षमतेचा आणि अनुभवाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फायदा होणार आहे, इतकेच मला आत्ता कळत आहे.
Puneri Paltan: '२००-२५० पाँइंट्स मिळवूनही संघ खालच्या स्थानावर असेल तर काही उपयोग नाही, त्यापेक्षा...' अस्लम इनामदार स्पष्टच बोललाभारतीय संघ सतत क्रिकेट खेळतो आहे. त्याचा परिणाम प्रशिक्षकांवरही होतो, हे मान्य करून गंभीर म्हणाले की, कप्तान आणि प्रशिक्षक चांगले का वाईट, हे संघाच्या कामगिरीवरून ठरत असते. संघाने चांगला खेळ करून अपेक्षित निकाल दिले तरच कर्णधार किंवा प्रशिक्षक चांगला ठरत असतो. मला वाटते की खेळाडूही हे जाणून आहेत. म्हणूनच नुसता सराव करण्यापेक्षा काही खेळाडू रणजी सामन्यात भाग घेऊन दक्षिण आफ्रिकन कसोटी मालिकेची तयारी करणार आहेत.
वाढदिवसाची भेटदोन कसोटी सामन्यांतला दणदणीत विजय हीच मला आज मिळालेली वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे, असे सांगून गंभीर यांनी पत्रकारांशी वार्तालाप संपवला.