आटपाडी: आज सायंकाळी आटपाडी पश्चिम भागातील गावांना पावसाने झोडपून काढले. पावसामुळे शेते तुडुंब भरून ओढ्या-नाल्यांनी पाणी वाहू लागलेय. यंदा काही केल्या पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडण्याचे नाव घेईना. पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवायंदा संपूर्ण आटपाडी तालुक्यात मेपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने कहर केला. अतिवृष्टी झाल्याने खरीप आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकतेच पंचनामे झाले आहेत. त्याची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. मॉन्सूनने राज्यातून काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे, तरीही आटपाडी तालुक्यात भाग बदलून पाऊस सुरू आहे.
गेल्या आठवड्यात खरसुंडी भागात, चार दिवसांपूर्वी आटपाडी आणि आज झरे भागात दमदार पाऊस पडला. दुपारी चार वाजता स्थानिक ढग निर्माण होऊन पाण्याने भरून आले. पाहता- पाहता पाऊस कोसळला. दिवाळी तोंडावर आली तरी पाऊस सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!विभूतवाडी, कुरुंदवाडी, पडळकरवाडी, झरे आणि परिसरात दीड तास पाऊस कोसळला. या पावसामुळे पेरणीसाठी तयार केलेली शेती पाण्याखाली गेली आहे. नाले दुथडी भरून वाहू लागलेत. अतिवृष्टीतून बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू केली होती. आजही पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.