Raigad Crime : सोशल मिडीयावरील ओळखीतून विवाहबाह्य संबंध; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या
Saam TV October 16, 2025 10:45 PM

सचिन कदम 

रायगड : सोशल मिडियावर एका तरुणाशी ओळख झाल्यानंतर संवाद होऊ लागला. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यानंतर महिलेने संबंधित तरुणाशी विवाहबाह्य संबंध ठेवले. मात्र पतीचा अडसर होत असल्याने पत्नीने प्रियकर आणि आपल्या मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथून समोर आली आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यात खडबड उडाली आहे. 

रायगडजिल्ह्यातील नागोठणे येथे हि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पाबळ तालुक्यातील पेण येथील रहिवासी कृष्णा नामदेव खंडवी (वय २३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मयत कृष्णा याची पत्नी दिपाली हिची सोशल मीडियावरून उमेश सदु महाकाळ याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन जवळीक वाढली होती. दरम्यान दीपाली आणि उमेश यांचे विवाहबाह्य प्रेम संबध प्रस्थापित झाले.  

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

पतीचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीची मदत  

दरम्यान विवाहबाह्य संबंध ठेवत असताना दीपाली हिला पती कृष्णा याचा अडसर वाटू लागला. यामुळे पतीचा काटा काढण्यासाठी या दोघांनी मैत्रिण सुप्रिया चौधरी हिची मदत घेतली. सुप्रिया हिने सोशल मिडियावर बनावट अकाऊंट उघडून कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पेण येथून नागोठणे येथे कृष्णाला बोलवले आणि नागोठणे येथील वरसगावच्या डोंगर भागात निर्जन ठिकाणी कृष्णाची हत्या केली.  

Cough Syrup : नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा जप्त; आंतरराज्य टोळीतील दोघे जेरबंद

केमिकल टाकून मृतदेह जाळला 

दरम्यान कृष्णा याला जीवे ठार मारल्यानंतर त्याची ओळख पटू नये; म्हणून मृतदेहावर केमिकल टाकले. तसेच मयत कृष्णा याचा मोबाईल फोडून फेकून दिला असल्याची माहिती पोलिससुत्रांनी दिली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास करतात धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून नागोठणे पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.