हरियाणात आयपीएस वाय पूरन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. एएसआय संदीप कुमार लाठर हे आयपीएस पूरन कुमार यांचा जवळचा पोलीस कर्मचारी असलेल्या सुशीलच्या अटक प्रकरणात तपास अधिकारी होते. लाठर यांनी आत्महत्येआधी एक व्हिडीओ आणि तीन पानी सुसाइड नोट लिहून ठेवलीय. यात संदीप कुमार यांनी वाय पूरन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसंच पूरन यांनी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेत त्यांचं कौतुक केलंय.
रोहतक जिल्ह्यात सायबर सेलमध्ये कार्यरत असणाऱ्या एएसआय संदीप कुमार लाठर यांचा मृतदेह लाढोत-धामर रोडवर असलेल्या नातेवाईकाच्या शेतात आढळून आला. मामाच्या शेतात ट्यूबवेलच्या मोटरसाठी बनवलेल्या खोलीत त्यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केली.संदीप कुमार यांनी ६ मिनिटांपेक्षा मोठा व्हिडीओ तयार केला असून त्यात पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर आणि रोहतकचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारणिया यांचं कौतुक केलंय. या दोन्ही अधिकाऱ्यांवर वाय पूरन यांनी गंभीर आरोप केले होते.
तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेतवाय पूरन कुमार यांनी एका हत्या प्रकरणात लाच घेतली होती आणि व्यावसायिकाला वाचवण्यासाठी ५० कोटींचं डील केलं होतं. बिजारणिया प्रामाणिकपणे राहिले आणि त्यांनी वाय पूरन यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केले. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बिजारणिया यांनी काम केल्याचा दावाही संदीप कुमारने त्याच्या सुसाइड नोटमध्ये केलाय.
एकीकडे राज्य सरकारने डीजीपी कपूर यांना सुट्टीवर पाठवलंय. तर बिजारणिया यांची बदली करण्यात आलीय. कपूर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सोमवारी रात्री घेण्यात आला. आयपीएस कुमार यांची आयएएस पत्नी अमनीत पी कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी केली होती. राज्य सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येला आठवडा झाल्यानंतरही अजूनही आयपीएस पूरन कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत.
पूरन कुमार यांचं नाव लाच प्रकरणात समोर आलं होतं. रोहतकमध्ये एका दारु ठेकेदारानं हेड कॉन्स्टेबल सुशील कुमार विरोधात लाच प्रकरणी तक्रार दाखल केली होती. सुशील कुमारने पूरण कुमार यांच्या नावे अडीच लाख मागितल्याचा दावा केला होता. या प्रकरणी सुशील कुमारला अटक केली होती.