बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत दिसतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. नुकताच अभिषेक बच्चन ला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यादरम्यान अभिषेक बच्चन प्रचंड भावूक होताना दिसला. यावेळी त्याला ऐश्वर्या रायची आठवण आली. ऐश्वर्या राय आणि आराध्याने मला जो पाठिंबा दिला, त्यांच्या पाठिंबाशिवाय हे शक्य नव्हते. हा पुरस्कार बघितल्यानंतर त्यांना विश्वास बसेल की, त्यांची मेहनत वाया गेली नाही. यासोबतच अभिषेकने म्हटले की, मी यापूर्वी कितीतरी वेळा भाषण तयार करायचो, पुरस्कार मिळाल्यानंतर करण्यासाठी पण याकरिता मला 25 वर्षांचा मोठा कालावधी लागला.
आता नुकताच कधीही न बघितलेला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ यापूर्वी कधीही पुढे आला नव्हता. या व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना ऐश्वर्याचा लूक जबरदस्त आवडताना दिसत आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या या व्हिडीओमध्ये आनंदी दिसत असून ती अभिषेक बच्चनसोबत गप्पा मारतंय.
ऐश्वर्या राय यासोबत अभिषेक देखील हसून गप्पा मारताना दिसतोय. ऐश्वर्या लाल रंगाच्या सूटमध्ये दिसतंय. यासोबतच तिने मस्त टिकली लावली आणि केस मोकळे सोडल्याने तिचा लूक अधिकच उठून येतोय. अभिषेक बच्चन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिषेक बच्चनला बोलल्यानंतर तेथून निघून जाताना ऐश्वर्या राय दिसत आहे. आजुबाजूला बरीच लोक त्यांच्या दिसत आहेत.
View this post on Instagram
A post shared by Aishwarya rai (@aishwaryaraibachchan_arb___)
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबद्दल काही खुलासा होऊ शकला नाही. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडताना दिसत आहे. काहींचे म्हणणे आहे की, हा व्हिडीओ करना चाैथचा आहे. ऐश्वर्या राय हिने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. अभिनेत्रीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय कायमच मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते.