डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक
People are not lazy. They simply have impotent goals - that is, goals that do not inspire them.
- Tony Robbins
प्रसंग १ ः एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळा घेतली. सॉफ्ट स्किल्स, अभ्यास कौशल्य वगैरे विषयांवर, वेगवेगळ्या खेळांच्या द्वारे अनेक विषयांचा धांडोळा घेतला. पोरं रमून गेली होती. मुलीच संख्येनं जास्त होत्या. जेवणाच्या सुट्टीनंतर परत येऊन बघतो तो काय, १०-१५ जी काही पोरं होती, ती गायबच झाली. एक औषधाला शिल्लक राहिला. त्याला विचारले ‘‘का रे, बाकीचे कुठं गेले?’’
तर म्हणतो कसा, ‘‘सर आमच्या गल्लीत मिरवणुका निघाल्यात, पोरं नाचायला गेलीत.’’
‘‘तू नाही गेलास?’’ मी विचारले.
‘‘सर, मी पण जाऊ का? विचारायला थांबलोय.’’ तो उत्तरला. मी कपाळावर हात मारून घेतला. इमानदारीत थांबलेल्या सर्व मुलींसाठी मग काही वेगळ्या विषयांवर चर्चा केली.
Eknath Shinde तात्काळ अधिकाऱ्याला फोन केला अन्.. पुढे बघा काय घडलं? | Pune News | Sakal Newsप्रसंग २ ः एका महाविद्यालयात नेतृत्वगुणासंबंधी व्याख्यान द्यायला गेलो होतो. दोन मुले आणि दोन मुली चक्क बेंचच्या खालील कप्प्यात ठेवलेल्या दप्तरात मोबाईल ठेवून चॅटिंग करत होते. ‘‘ही त्यांची नेहमीची सवय आहे, अस्वस्थ होतात. व्यसनच आहे त्यांचे.’’ त्यांचे प्राध्यापक मला नंतर सांगते झाले. त्या चौघांना गमतीने सल्ला दिला, ‘‘अगदी दीड कोटींचे नुकसान होणार असेल तर किंवा ब्रेकअप होणार असेल तरच खुशाल मोबाईलशी खेळा.’’
निसर्गात जातात आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडतात. स्वतःच्या व्यवसायाशी, हाती घेतलेल्या कामाशी एकनिष्ठ राहून, पक्का व्यावसायिक दृष्टिकोन अंगी बाळगून, काही महत्त्वाकांक्षा मनी ठेवणाऱ्या, अंग झाडून मेहनत करणाऱ्या व्यक्तींची खरे तर नेहमीच वाहवा केली जाते. त्यांना यश मिळते. नेहमी मला म्हणावेसे वाटते, आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा कणभर तरी वेगळा उगवायला नको का? कालचा सूर्य आज नसतो.
आजचे आभाळ कालच्यापेक्षा काकणभर का होईना सुंदर आणि वेगळे भव्य असू शकतो. कदाचित सागराची अथांगता नव्याने माहिती होऊ शकते. अज्ञात अंतराळात, खूप दूरवरच्या ताऱ्याकडून अस्पष्ट का होईना संदेश येऊ शकतात. बदल हा काळाचा स्थायीभाव आहे. परंतु काही मूढ महाभागांना काहीच खटकत नाही. एक कडक, अपरिवर्तनीय मनोवस्था अशांची होऊन बसलेली असते. शिक्षण अशांना काय शिकवते? किंवा योग्य त्या शिक्षणाच्या अभावाने, कल्पक प्रशिक्षणाच्या कमतरतेने तर वरील प्रसंगातील तरुणांची कुंठित मनोवस्था अशा अभाग्यांच्या आयुष्यात आलेली तर नसेल ना?
एनसीसी, एनएसएस, स्काउट-गाइड वगैरे उपक्रमांद्वारे स्वतःचा छान व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणारे, उमद्या मनाचे, भरलेली मने घेऊन, आयुष्य मस्त घडवणारे तरुण आहेत. नाराज व्हायचे कारण सध्या तरी दिसत नाही.