Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले
esakal October 16, 2025 01:45 AM

Maharashtra Politics : राज्यातील मतदार याद्यांमधील अनियमिततेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने आज निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसेचे नेते एकत्र आले.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, जयंत पाटील, राज ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की, “मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड होत असून, भाजपचे काही पदाधिकारी यामागे आहेत.” असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही आज आणि काल निवडणूक आयोगाला भेट दिली, पण भाजपकडून कोणीही हजर राहिले नाही. २०२४ च्या निवडणुकीच्या आधी ऑक्टोबरमध्ये आम्ही आयोगाला पत्र दिले होते. मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असल्याची माहिती पुराव्यांसह दिली होती. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत एकाच व्यक्तीचे नाव चार-चार ठिकाणी दिसत आहे. या याद्या आम्ही घरी बसून छापलेल्या नाहीत, त्या अधिकृत आहेत. जर निवडणुका घ्यायच्या असतील, तर निपक्षपाती पद्धतीने घ्या. अन्यथा निवडणुकीऐवजी ‘सिलेक्शन’ करा आणि मोकळे व्हा! असा थेट इशार उद्धव ठाकरे यांनी दिला.

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.