ग्लेन मॅक्सवेलने भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची सर्वोत्तम ODI इलेव्हन तयार केली.
परंतु इंग्लंडच्या एकाही खेळाडूला त्याने यात स्थान दिले नाही.
भारताच्या सहा खेळाडूंना त्याने स्थान दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असून तिथे त्यांना ३ वनडे आणि ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज असून खेळाडूंमध्येही उत्साह आहे.
दरम्यान, असे असले तरी पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे या मालिकांमधून बाहेर आहेत. पण ते मैदानाबाहेर राहुन संघाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सध्या या मालिकांबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यादरम्यानच मॅक्सवेलने भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम इलेव्हन तयार केली, पण त्यानी यात इंग्लंडच्या एकाही खेळाडूला संधी दिली नाही.
Ind Vs Aus ODI : भारताविरुद्ध मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! सलामीवीर फलंदाजासह फिरकीपटू संघातून बाहेर, कारण काय?मॅक्सवेलने फॉक्स क्रिकेटशी बोलतासा ही इलेव्हन जाहीर केली. त्याला सांगण्यात आले होते की केवळ ५ ऑस्ट्रेलियन खेळाडूंना यात तो स्थान देऊ शकतो, तर बाकी स्थानी त्याला भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना निवडावं लागणार होतं. यानंतर त्याने त्याच्या वैयक्तिक मतानुसार, फॉर्मनुसार आणि खेळावरील प्रभावानुसार खेळाडूंची निवड केली आहे.
मॅक्सवेलने भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. यावेळी त्याने डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू हेडन आणि ऍडम गिलख्रिस्टसारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची निवड केलेली नाही.
त्याने तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीची निवड केली आहे. त्याने विराटला त्याच्या पिढीतील सर्वोत्तम वनडे फलंदाज असल्याचे म्हटले आहे. त्याने चौथ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची निवड केली आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर बेन स्टोक्स आणि ओएन मॉर्गन यांना सोडून त्याने मायकल बेवनची यांची निवड केली.
याशिवाय त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून शेन वॉटसनला निवडले. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने गिलख्रिस्ट आणि जॉस बटलर ऐवजी एमएस धोनीची निवड केली. त्याने धोनीची अनुभव, फिनिशर म्हणून क्षमता आणि एकहाती विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणून निवड केली आहे.
IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिलने MS Dhoni ची परंपरा राखली... विजयाची ट्रॉफी बघा कोणाच्या हाती सोपवली; Video Viralगोलंदाजीसाठी त्याने ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्रा या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांसह भारताच्या जसप्रीत बुमराहला निवडले आहे. फिरकी गोलंदाजीसाठी त्याने अनिल कुंबळेची निवड केली.