MAI Image 1 : Gemini अन् ChatGPT ला टक्कर! मायक्रोसॉफ्टने आणलं भन्नाट फीचर, आता बनवा एकापेक्षा एक भारी फोटो..असं वापरा MAI Image 1
esakal October 16, 2025 01:45 AM

Microsoft AI Image Generator Prompt : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात एक नवी तुफान स्पर्धा सुरू झाली आहे..मायक्रोसॉफ्टने त्याची नवीन 'एमएआय-इमेज-1' हे मॉडेल लाँच केली आहे, जी टेक्स्ट टायप करून जबरदस्त इमेजेस तयार करते. गुगलच्या 'जेमिनी नॅनो बॅनाना' आणि ओपनएआयच्या 'चॅटजीपीटी' इमेज टूल्सला थेट टक्कर देणारी ही टूल आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मजेदार, क्रिएटिव्ह इमेजेस आता तुमच्या हातात असतील आणि तेही फक्त काही सेकंदात

गेल्या महिन्यांत गुगलची 'नॅनो बॅनाना' फीचरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. बॅनाना-थीम्ड मजेदार इमेजेस लाखो लोकांनी बनवले. आता मायक्रोसॉफ्ट म्हणते, आमची एमएआय-इमेज-1 ही त्यापेक्षा वेगवान आणि क्रिएटिव्ह आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट्स आणि डिझायनर्सच्या मदतीने विकसित केलेली ही मॉडेल सामान्य इमेजेस टाळते. ती फोटो रिअॅलिस्टिक इमेजेस बनवते ज्यात प्रकाश, टेक्स्चर आणि निसर्गरम्य दृश्ये अतिशय नैसर्गिक दिसतात.

Instagram P13 : लाडका लेक Instagram वर काय करतोय? आता वापरावर पालकांचा कंट्रोल; आई वडिलांना पाहता येणार ॲक्टिविटी, काय आहे PG-13

कंपनीचा दावा आहे की, ही मॉडेल इतरांपेक्षा दुप्पट वेगाने काम करते तरी डिटेल्समध्ये काहीच कमी नाही. एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म 'एलएमअॅरिना'नेही तिचे कौतुक केले आहे. मानवी तज्ज्ञांनी तिला टॉप 10 इमेज जेनरेटर्समध्ये स्थान दिले आहे. म्हणजे क्रिएटिव्ह वर्कसाठी परफेक्ट आहे.. मायक्रोसॉफ्टचा एआय इकोसिस्टम आता आणखी मजबूत झाला आहे. ही नवीन टूल 'एमएआय-व्हॉईस-1' (व्हॉईस जेनरेटर) आणि 'एमएआय-1-प्रिव्ह्यू' (चॅटबॉट) सारख्या मॉडेल्ससोबत जोडली गेली. आधी ओपनएआयवर अवलंबून असलेली कंपनी आता स्वतःच्या टूल्सवर भर देत आहे.

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

अँथ्रोपिक सारख्या पार्टनर्ससोबतही मायक्रोसॉफ्ट ३६५ अॅप्समध्ये एआय आणत आहे. यामुळे बिझनेस आणि क्रिएटिव्ह यूजर्सना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व काही मिळेल. सेफ्टीकडेही पूर्ण लक्ष देण्यात आले आहे.. मायक्रोसॉफ्ट सांगते की, एमएआय-इमेज-1 मध्ये बिल्टइन सेफगार्ड्स आहेत. चुकीच्या किंवा हानिकारक इमेजेस रोखण्यासाठी डिझाइन केलेली ती एथिकल एआयचा उदाहरण आहे. इंडिपेंडंट रिव्ह्यूज येणे बाकी असले तरी कंपनीचा विश्वास दिसतो.

Crime News : वर्गात सर रागावले; विद्यार्थ्यांची हटली..शिक्षकाच्या गर्भवती बायकोसह 2 मुलींचा घेतला जीव, कसा घडला थरार..वाचा सविस्तर

एआय क्रिएटिव्हिटीच्या रेसमध्ये मायक्रोसॉफ्ट आता आघाडीवर येणार आहे.. गुगलच्या बनाना आणि चॅटजीपीटीला आव्हान देणारी ही टूल लाखो कलाकारांना, सोशल मीडिया स्टार्सना आणि सामान्य यूजर्सच्या क्रिएटिविटीला नवीन जादू देईल. चला तर मग मग तुम्ही पण हे ट्राय करा आणि आम्हाला कमेन्टमध्ये कळवा

FAQs

1. What is MAI-Image-1? / एमएआय-इमेज-१ म्हणजे काय?
मायक्रोसॉफ्टची नवीन टेक्स्ट-टू-इमेज एआय टूल जी मजेदार आणि रिअॅलिस्टिक इमेजेस सेकंदात बनवते.

2. How is it better than Gemini Nano Banana? / ही जेमिनी नॅनो बॅनानापेक्षा कशी चांगली?
ती दुप्पट वेगाने काम करते आणि प्रकाश-टेक्स्चरसह नैसर्गिक इमेजेस तयार करते, जे बॅनाना फीचरपेक्षा क्रिएटिव्ह आहे.

3. Is MAI-Image-1 safe to use? / एमएआय-इमेज-१ वापरण्यास सुरक्षित आहे का?
होय, त्यात बिल्ट-इन सेफगार्ड्स आहेत जे चुकीच्या किंवा हानिकारक इमेजेस रोखतात, एथिकल एआयसाठी परफेक्ट!

4. Where can I access MAI-Image-1? / मी एमएआय-इमेज-१ कुठे वापरू शकतो?
मायक्रोसॉफ्टच्या एआय इकोसिस्टममध्ये, लवकरच ३६५ अॅप्स आणि वेबवर उपलब्ध होईल.

5. Can it make viral social media images? / याने सोशल मीडियासाठी व्हायरल इमेजेस बनवता येतील का?
खरंय! "रंगीबेरंगी पक्षी" सारखे डिस्क्रिप्शन द्या आणि लगेच शेअर करा, लाखो लाईक्स मिळतील!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.