मुंबई : राज्यभरात वाहतूक कोंडीच्या समस्या वाढत असल्याचे समोर येत आहेत. अशातच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १२ तास वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी अडकले असून चालकांचेही अतोनात हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरजिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरवाहतूक कोंडी झाली. मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी सुरू झाली असून बुधवारी पहाटेपर्यंत वाहतूक कोंडीचे चित्र जैसे थे होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह मुंबई आणि ठाण्यातील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बारा बस वसईजवळ अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या.
Palghar News: वसई-विरार कोंडीच्या कचाट्यात! वाहतूक व्यवस्था कोलमडली, प्रवासी हैराणदरम्यान, अन्न-पाण्याशिवाय ५०० हून अधिक विद्यार्थी अडकले असल्यामुळे एका सामाजिक संस्थेचे स्थानिक स्वयंसेवक घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या मुलांना पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
जड वाहनांचे वळणअधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाण्यातील घोडबंदर महामार्गावरून जड वाहने वळवण्यात आल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे, जिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. वळवल्याने मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि वसईजवळील भागात वाहतूक कोंडी झाली.
ते पण आपल्यातलेच! मुंबईतील 'कबुतरां'च्या वादात PETA ची उडी; Video तून करतायेत जनजागृती पालकांचा अधिकाऱ्यांवर संतापमुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत ५००हून अधिक विद्यार्थी अडकले असून पालकांनी संबंधित अधिकऱ्यांवर संताप व्यक्त केला. “आमची मुले तासन्तास मदतीशिवाय, अपडेटशिवाय आणि पोलिसांच्या उपस्थितीशिवाय अडकून पडली होती,” असे पालकांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी दुरुस्ती आणि वळवण्याच्या कामांदरम्यान नियोजन करण्याची विनंती वाहतूक विभाग आणि नागरी अधिकाऱ्यांना केली आहे.