जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन शाळेचे यश
रोहा, ता. १५ (बातमीदार) ः येथील ग्रेगोरियन शाळेमध्ये जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ला रोहाच्या सर्व नेटबॉल संघांनी आपल्या होम पिचवर उत्कृष्ट कामगिरी करत सुयश संपादित केले आहे.
यामध्ये १४ वर्ष, १७ वर्ष, व १९ वर्षांखालील मुले व मुली या तीनही ग्रुपमध्ये ग्रेगोरियन स्कूलच्या नेटबॉल संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १७ वर्षांखालील मुले व मुली यांनी अंतिम विजेतेपद मिळविले, तर १४ वर्षांखालील मुले व मुली नेटबॉल संघांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय तर मुलींच्या संघांनी द्वितीय क्रमांक पटकावला. समारंभात ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे प्राचार्य फादर जोसेफ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येथील मार्गदर्शक सुधीर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेगोरियन स्कूलच्या सर्वच संघांनी सर्वोत्कृष्ट खेळ केला. विजेत्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्व यशस्वी खेळाडूंना प्राचार्य, शिक्षक व पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो कॅप्शन : जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत सहभागी घेतलेले ग्रेगोरियन पब्लिक रोहा स्कूलचे विद्यार्थी.