दिवाळीची भीती : बनवा संक्रमित करा, वापरा, वापरा आणि वापरा
Marathi October 16, 2025 08:26 PM

दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे. दिवाळी खरेदी आणि फराळ या दोन्ही गोष्टींशिवाय अपूर्ण असते. काही ठिकाणी दिवाळीचा फराळ तयार झाला पण असेल तर काही घरात सुरु असेल. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसंतसे आपल्याला मिठाईचा सुंगध आणि गोडवा जाणवू लागतो. आरोग्याच्या बाबातीत सजग असलेले लोकही या दिवसात फराळाची चव घेतल्याशिवाय राहत नाही. पण, तुम्ही यंदा आरोग्यादायी फराळ बनवू शकता. यासाठी साखरेऐवजी कोणते नैसर्गिक गोड पदार्थ वापरता येतील पाहूयात,

गूळ –

गूळात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस आदी पोषक घटक असतात. यामुळे शरीर बळकट होते. याशिवाय पोटाची यंत्रणाही निरोगी राहते. त्यामुळे यंदा लाडू, करंज्या अशा मिठाईमध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरू शकता.

हेही वाचा – दिवाळीत गोड खाण्यापूर्वी सावधान! मग खरी आणि भेसळयुक्त मिठाई ओळखायची कशी?

खजूराची पेस्ट –

खजूरापासून मिठाई बनवता येते. यात फायबर, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 असते. खजूराची पेस्ट तुम्ही लाडू आणि चॉकलेटमध्ये वापरू शकता. खजुराची पेस्ट साखरेला एक उत्तम पर्याय आहे.

मध –

मध ऍटी-ऑक्सिडंट्स आणि ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. दिवाळीत गोडाचे पदार्थ बनवताना जसे की, शिरा, हलवा अशा पदार्थात मध वापरू शकता.

फळांची प्युरी –

दिवाळीत केक, मफिन आणि हलवा बनवला जातो. या पदार्थात साखरेऐवजी फळांची प्युरी वापरता येईल. यामुळे दिवाळीत गोडाचा आस्वाद मनसोक्त घेता येईल.

नारळ साखर –

कोकोनट शुगरची चव अतिशय नैसर्गिक असते. यातील ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. याचा वापर लाडू, बर्फी किंवा खीर बनवण्यासाठी करता येईल.

हेही वाचा – National Dessert Day: कुठून झाली गोड पदार्थांची सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.