ओला शक्ती: ओला इलेक्ट्रिकने आज 16 ऑक्टोबर रोजी ओला शक्ती लाँच केली आहे. बहुउद्देशीय ऊर्जा समाधान उत्पादन ओला शक्ती हे एक पोर्टेबल उपकरण आहे ज्याचा वापर घरातील एसी आणि रेफ्रिजरेटर, शेतात आणि व्यवसायाच्या ठिकाणी पाण्याचे पंप करण्यासाठी केला जाऊ शकतो. ओला शक्ती लॉन्च कॉन्फरन्स चालू असताना, या घोषणेनंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स वाढले.
या लॉन्चसह, इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) विभागात प्रवेश केला आहे. कंपनीची सध्याची गिगाफॅक्टरी, 4680 सेल तंत्रज्ञान आणि देशभर पसरलेल्या स्टोअर नेटवर्कद्वारे कोणत्याही अतिरिक्त भांडवली खर्चाशिवाय या बाजारपेठेत विस्तार करण्याची योजना आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या मते, ओला शक्तीमध्ये झटपट पॉवर चेंज, वेदरप्रूफ IP67-रेट केलेल्या बॅटरी आणि कनेक्टेड ॲपद्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
ओला शक्ती 1.5 kWh, 3 kWh, 5.2 kWh आणि 9.1 kWh या चार क्षमतेमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. पहिल्या 10 हजार युनिट्ससाठी, 1.5 kWh ओला शक्तीची किंमत ₹29,999, 3 kWh ची ₹55,999, 5.2 kWh ची किंमत ₹1,19,999 आणि 9.1 kWh ची किंमत ₹1,59,999 इतकी निश्चित करण्यात आली आहे. प्री-बुकिंग ₹999 पासून सुरू झाली आहे आणि पुढील वर्षी 2026 मध्ये मकर संक्रांतीपासून वितरण सुरू होईल.