आयपीएल स्पर्धेच्या साम्राज्याला धक्का! ब्रँड व्हॅल्यूत झाली इतकी मोठी घसरण
GH News October 17, 2025 12:11 AM

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड होण्याचं कारणच ही स्पर्धा आहे. 2008 साली या लीगची स्थापना झाली होती. तेव्हापासून या लीगने नवीन उंची गाठली आहे. पण अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामुळे या लीगला नजर लागल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. त्याला काही कारणं आहेत. पण गेल्या काही स्पर्धेनंतर लीगची ब्रँड व्हॅल्यू काढली तर त्यात घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 82,700 कोटी रुपये होती. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ब्रँड व्हॅल्यू 76100 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. वार्षिक मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या डीडी अँड एडव्हायझरीने आयपीएलच्या मूल्यात सलग दुसऱ्या वर्षी घट नोंदवली आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ही 92500 कोटी रुपये होती. 2023 मध्ये 92500 कोटी रुपयांवरून 2024 मध्ये 82700 कोटी रुपये आणि 2025 मध्ये 76100 कोटी रुपये झाली आहे. आयपीएल ब्रँडला मागच्या दोन वर्षात 16400 कोटींचा फटका बसला आहे.

डी अँड पी एडव्हायझरीच्या 2025 आयपीएल आणि डब्ल्यूपीएल मूल्यांकन अहवाल ‘बियॉन्ड 22 यार्ड्स – ‘द पॉवर ऑफ प्लॅटफॉर्म्स, द प्राइस ऑफ रेग्युलेशन’ अहवाल सादर करण्यात आला. बियॉन्ड 22 यार्ड्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की आयपीएलला इतका मोठा धक्का बसण्याची दोन मुख्य कारणे आहेत. प्रसारण कंपन्यांच्या विलीनीकरणाचा फटका बसला आहे. 2024 मध्ये डिस्ने स्टार आणि व्हायकॉम 18 या आघाडीच्या प्रसारण कंपन्यांचं विलिनीकरण झालं. त्यामुळे मिडिया हक्कासाठीची स्पर्धा कमी झाली. त्याचा फटका आयपीएल प्रसारणाच्या मूल्यावर झाला आहे.

दुसरं म्हणजे मनी गेमिंग एपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या स्पर्धेवर दिसून आला आहे. मनी गेमिंग एप आयपीएलला प्रायोजकत्व बजावत होत्या. त्या माध्यमातून आयपीएलला ब्रँड व्हॅल्यू वाढली होती. दरवर्षी 1500 ते 2000 कोटी रुपयांचे योगदान मिळत होतं.पण आता एपवरच बंदी घातल्याने बाजार उठला आहे. त्यामुळे या कंपन्याकडून येणारा पैसा थांबला आहे. त्यामुळे लीगच्या महसुलात घट झाली आहे. या दोन कारणांमुळे आयपीएलचं मूल्यांकन घसरलं आहे. दुसरीकडे, WPL इकोसिस्टम मूल्यांकन मागील आवृत्तीच्या तुलनेत, वुमन्स प्रीमियर लीगचे मूल्य 1350 कोटी रुपयांवरून 1275 कोटी रुपयांपर्यंत घरसलं आहे. 5.6 टक्क्यांची घट दिसून येत आहे. या लीगच्या मूल्यात होणारी घसरण ही भारतीय क्रिकेटसाठी काहीशी चिंतेची बाब आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.