Arjun Tendulkar dismissed for 1 run in Ranji match Goa vs Chandigarh : रणजी करंडक स्पर्धेत गोवा संघातून एकाच डावात दोन द्विशतक झळकवली गेली. गोवा विरुद्ध चंडीगढ लढतीत गोवा संघाने ८ बाद ५५० धावांचा डोंगर उभा केला. अभिनव तेजराना ( Abhinav Tejrana) आणि ललित यादव ( Lalit Yadav) यांनी द्विशतकं झळकावली. पण, या संघाकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकर फक्त १ धाव करून माघारी परतला.
मंथन खुटकर व सूयश प्रभूदेसाई यांची ४५ धावांची भागीदारी विष्णूने तोडली. मंथन २१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सूयश ( ४७) व अभिनव ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी ९७ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. कश्यप बाकळे भोपळ्यावर माघारी परतला. अभिनव व ललित यादव या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५१० चेंडूंत ३०९ धावा जोडल्या.
Ranji Trophy : ३८ चेंडूंत १५४ धावा! Vaibhav Suryavashi च्या सहकाऱ्याने ठोकले द्विशतक; बिहारी पोरगा पेटला, एकहाती भाव खाऊन गेलाअभिनव ३२० चेंडूंत २१ चौकार व ४ षटकारांसह २०५ धावांची खेळी केली. कर्णधार दीपराज गांवकर ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर दर्शन मिसाळ व ललित यादव यांनी १४९ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी करून गोवा संघाचा डाव पुन्हा सारवला. पण, दर्शन ३२ धावांवर बाद झाला. ललित यादव द्विशतकाच्या जवळ असताना गोव्याच्या विकेट पडू लागला, तेव्हा अर्जुन तेंडुलकरमैदानावर आला.
अर्जुन ६ चेंडूंवर एक धावेवर झेलबाद झाला आणि पाठोपाठ मोहित रेडकरने ( ८) विकेट फेकली. पण, ललित ३८४ चेंडूंत २० चौकार व ४ षटकारासह २०३ धावांवर खेळतोय आणि गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा झाल्या आहेत. चंडीगढच्या विष्णूने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
Ishan Kishan Century: १५ चौकार, ६ षटकार! कर्णधार इशान किशनचे थोडक्यात हुकले द्विशतक, टीकाकारांना दिले उत्तर...प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात अभिनवने द्विशतक झळकावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २४ वर्षीय अभिनव हा गोवा संघाकडून पदार्पण करताना प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी २०२२ मध्ये अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध १२० धावा करून हा पराक्रम केला होता.
प्रथम श्रेणीत पदार्पणात द्विशतक झळकावणारा अभिनव हा गोव्याचा पहिलाच फलंदाज ठरला, तर एकंदर १३ फलंदाजांना असा पराक्रम करता आला आहे. यामध्ये गुंडप्पा विश्वनाथ व अमोल मुझुमदार या दिग्गजांचाही समावेश आहे.