-rat१२p२०.jpg-
KOP२५N९८०९४
राजापूर ः प्रसाद मोहरकर यांच्या सुगंधी उटणे वाटप उपक्रमाचा प्रारंभ करताना आमदार किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकारी.
-----
जुवाठी गणात उटण्याचे वाटप
प्रसाद मोहरकरांचा उपक्रम ; ग्रामस्थांमधून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः दिवाळीची चाहुल लागली असून शिवसेनेचे युवा नेते प्रसाद मोहरकर यांनी जुवाठी पंचायत समिती गणातील ग्रामस्थांना सुगंधी उटण्यासह शुभेच्छा संदेश देणारे पत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. याचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोहरकर यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे.
पाली येथे झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार सामंत यांच्यासह जिल्हा परिषद माजी सदस्य विलास चाळके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दिपक नागले, समन्वयक प्रकाश कुवळेकर, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, युवा तालुका प्रमुख सुनिल गुरव, विभागप्रमुख नाना कोरगावकर, नरेश दुधवडकर, भिमराव कोंडविलकर उपस्थित होते.