-rat८p१०.jpg-
KOP२५N९७२९९
रत्नागिरी : स्मार्ट ग्रोथ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. एस. एन. गवाले. सोबत नंदा शेलार, भक्ती बांदिवडेकर, वसीम आवटे, नारायण बांदिवडेकर आदी.
---
‘स्मार्ट ग्रोथ’ कोर्सेस सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : स्मार्ट ग्रोथ अॅडव्हान्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन कुवारबाव येथील गुरूसागर अपार्टमेंटमध्ये एस. पी. हेगशेट्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाले यांच्या हस्ते करण्यात आले.
अलीकडे कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांनी टॅली, एआयसारखे तंत्रज्ञान, अभ्यासक्रम शिकून घेतले पाहिजे. या उद्देशाने स्मार्ट ग्रोथ इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी सिद्धांतात्मक जीएसटी नव्हे तर प्रात्यक्षिक पद्धतीने नोंदणी व आणि रिटर्न फायलिंग शिकतील, अशी माहिती संचालकांनी दिली. यावेळी एमकेव्ही इंग्लिश स्कूलच्या संचालिका नंदा शेलार यांच्यासमवेत स्मार्ट ग्रोथची तज्ज्ञ टीम भक्ती बांदिवडेकर, वसीम आवटे, सौ. आवटे, नारायण बांदिवडेकर हे उपस्थित होते.