हत्ती किती वर्षे जगतो? सरासरी आयुष्य किती?
esakal October 17, 2025 11:45 AM

Elephants Live Average Lifespan

ताकदवान प्राणी

जगात कोट्यवधी प्राणी आहेत, प्रत्येकाचं आयुष्य आणि राहणीमान वेगळं असतं. हत्ती त्यात सर्वात अवाढव्य आणि शक्तिशाली असा प्राणी आहे.

Elephants Live Average Lifespan

प्रचंड आकार

हत्तीचा प्रचंड आकार आणि ताकद पाहून लोकांना भीती वाटते. बिथरलेला हत्ती एखादं मोठं वाहनही सहज चिरडून टाकू शकतो.

Elephants Live Average Lifespan

बुद्धिमान प्राणी

हत्तीचा शरीरबांधा, शक्ती आणि बुद्धिमत्ता विलक्षण आहे. तो गाड्या, झाडं आणि भिंती सहज उद्ध्वस्त करू शकतो.

Elephants Live Average Lifespan

हत्तीचं आयुष्य किती?

लोकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो. हत्ती किती वर्षे जगतो? त्याचं सरासरी आयुष्य किती असतं याचं कुतूहल सर्वांनाच वाटतं.

Elephants Live Average Lifespan

वातावरण आणि खाद्य

हत्तीचं आयुष्य तो कोणत्या भागात राहतो, त्याचं खाद्य काय, वातावरण कसं आहे यावर ठरतं.

Elephants Live Average Lifespan

दीर्घायुष्य कसं?

हत्ती दररोज शेकडो किलो गवत, पानं आणि झाडांची साल खातात. खाद्याचं प्रमाण आणि गुणवत्ता त्याच्या दीर्घायुष्यास कारणीभूत ठरतं.

Elephants Live Average Lifespan

सरासरी आयुष्य

हत्तीचं सरासरी आयुष्य साधारण ६० ते ७० वर्षांच्या दरम्यान असतं. काही हत्ती ८० वर्षांपर्यंत जगतात हे दुर्मिळ पण शक्य आहे.

Elephants Live Average Lifespan

आफ्रिकन हत्ती

आफ्रिकन हत्ती हे सरासरी ६० ते ७० वर्षे जगतात. त्यांचा आकार मोठा असल्यानं आणि वातावरण मोकळं असल्यानं ते जास्त जगतात.

Elephants Live Average Lifespan

आशियाई हत्ती

आशियाई हत्ती हे आफ्रिकन हत्तींपेक्षा जास्त वर्षे जगतात. आशियाई हत्तींचं आयुष्य साधारण ७० ते ८० वर्षं असतं.

Narmada River

भारतातली ही एकमेव नदी, उलटी का वाहते? इथं क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.