Crime : धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग, ड्रायव्हरचं लाजिरवाणे कृत्य, नगरकरांचा संताप अनावर
Saam TV October 17, 2025 11:45 AM

सुशिल थोरात, अहमदनगर प्रतिनिधी

School bus driver molests 10th-grade girl in Ahmednagar : अहिल्यानगरमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायकमध्ये स्कूलबसमध्ये चालकाने दहावीच्या मुलीचा विनयभंग केला. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली. नगरकरांनी त्या स्कूल बस चालकाला बेदम चोपला अन् पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ही घटना समोर आल्यानंतर नगरमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलींना शाळेत पाठवायचं कसं? असा सवाल काही लोकांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (school bus driver was arrested in Ahmednagar for allegedly molesting a 10th-grade girl)

अहिल्यानगर शहरातील उपनगर भागातील तपोवन रोडवर ही संतापजनक घटना घडली. दहावीतशिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा स्कूलबसच्या ड्रायव्हरने विनयभंग केला. शाळा सुटल्यानंतर घरी सोडताना मुलगी एकटी असल्याचे पाहून चालकाने घाणेरडं कृत्य केले. स्कूलबसमधून उतरल्यानंतर मुलीने चालकाने केलेल्या कृत्याचा पाढा पालकांसमोर वाचला. हे ऐकताच पालकांचा राग अनावर झाला. त्यांनी चालकाला गाठले अन् बेदम चोपला. आजूबाजूच्या लोकांनीही यात हस्तक्षेप घालत पोलिसांना बोलवले. जमावाने चालकाला बेदम मारत राग व्यक्त केला.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात जाताच विराटची डरकाळी, एक पोस्ट केली अन् खळबळ उडाली, वाचा किंग नेमकं काय म्हणाला?

स्कूल बसमध्ये मुलीकडे पाहून घाणेरडं अन् लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या नराधम चालकाचे नाव बाळू दादा वैरागर असे आहे. बाळूला नगरकरांनी बेदम मारले अन् पोलिसांच्या ताब्यात दिले. तोफखाना पोलिसांनी बाळूच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात विनयभंग, धमकी अन् पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.

Sharad Pawar Setback : शरद पवारांना जबरी धक्का, ३ निष्ठावंताचा 'जय महाराष्ट्र', जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचं कारण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.