राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रध्दांजली वाहिली आहे. सकाळी अचानक छातीत दु:ख असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचे निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. शिवाजीराव कर्डिले आपल्या मतदार संघातील लोकांसाठी अहोरात्र काम करत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नगर जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हात शोककळा पसरली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली. अधिक माहिती अशी की, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झाले. राहुरी मतदार संघात त्यांचे एकहाती प्रभुत्व होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते. सकाळी अचानकपणे छातीत दु:ख असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी नगर जिल्हात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी थेट रूग्णाालयाकडे धाव घेतली. पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असा प्रवास करून सध्या ते भाजपात होते. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.