Post Office Service: आता पोस्टानं पाठवलेलं पत्र किंवा पार्सल लवकर पोहोचणार; पोस्ट ऑफिस नवीन सेवा सुरू करणार, अंमलजावणी कधी?
esakal October 18, 2025 11:45 AM

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलिकडेच एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय टपाल विभाग नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार आहे. एकदा या सेवा लागू झाल्यानंतर, पोस्ट ऑफिस २४ तास आणि ४८ तासांच्या आत टपाल आणि पार्सल पोहोचवण्याची हमी देतील. याचा अर्थ असा की, एकदा ही सेवा सुरू झाली की, तुम्हाला तुमचे महत्त्वाचे कागदपत्रे किंवा पार्सल पोहोचवण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.

२४ तास चालणारी स्पीड पोस्ट सेवा कोणत्याही पोस्टल वस्तूची डिलिव्हरी एका दिवसात करण्याची हमी देईल असे त्यांनी स्पष्ट केले. ४८ तास चालणारी स्पीड पोस्ट सेवा दोन दिवसांत पार्सल डिलिव्हरी करेल. यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार जलद किंवा हळू डिलिव्हरी निवडता येईल. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, या सेवा जानेवारीमध्ये सुरू केल्या जातील.

Gold Prediction: सोनं आणखी 30 टक्के वाढणार; पुढच्या दिवाळीपर्यंत किती होणार भाव? अॅक्सिसने वर्तवला अंदाज

सिंधिया यांनी असेही जाहीर केले की, पार्सल डिलिव्हरीचा वेग लक्षणीयरीत्या सुधारला जाईल. सध्या पार्सल डिलिव्हरीला तीन ते पाच दिवस लागतात. परंतु आता पोस्ट ऑफिस पुढच्या दिवशी डिलिव्हरी देईल. ज्यांना जलद व्यवसाय शिपमेंटचीआवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ही विशेषतः चांगली बातमी आहे. २०२९ पर्यंत भारतीय टपाल विभागाला एक फायदेशीर सेवा प्रदाता बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जो आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि फायदेशीर दोन्ही असेल.

Dmart Sale : डीमार्टमध्ये सुरुय प्री-दिवाळी वीकेंड सेल; 50% ते 80% डिस्काउंट, एकदम स्वस्तात मिळतायत वस्तु, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, टपाल विभाग जनतेला चांगल्या आणि जलद सेवा देण्यासाठी नवीन उत्पादने आणि सेवा सुरू करत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, टपाल विभाग एकूण आठ नवीन उत्पादने सुरू करेल. ज्यामध्ये या जलद वितरण सेवांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे केवळ ग्राहकांना फायदा होणार नाही तर टपाल विभागाच्या सेवांमध्येही सुधारणा होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.