नांदेड: दीपावली सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नांदेड शहरातील बाजारपेठा सध्या उत्साहाने उजळल्या आहेत.लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्तींपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तूंवर नागरिकांनी झडप घातली आहे.
बाजारपेठांमध्ये रेशमी फुलांच्या माळा,आकर्षक दिवे, कंदील, रंगीत तोरणे आणि विविध पूजावस्तूंची सजावट केल्याने संपूर्ण परिसर सणाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनासाठी आकर्षक मूर्तींची मोठी मागणी असून, बाजारात दीड फुटांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत.
Nanded Trains: दिवाळीनिमित्त रेल्वेगाड्या हाउसफुल्ल! नांदेड विभागाकडून तीसपेक्षा अधिक विशेष रेल्वेंचे नियोजन१०० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यंदा मूर्तींच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाली असली तरी विक्रेत्यांनी ग्राहकांना विशेष सवलती दिल्या आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या असून अनेक दुकानांत ‘हाऊसफुल्ल’चा माहोल दिसतोय.
यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर असल्याने मातीच्या दिव्यांना आणि इको-फ्रेंडली पूजासाहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फुलांच्या बाजारात नैसर्गिक आणि कृत्रिम फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तसेच घर सजावटीसाठी रांगोळी, तोरणे, कंदील, फुलांच्या माळा यांची विक्रीही वाढली आहे.
Electric Shock: शॉक लागून महिलेचा मृत्यू; वागदरवाडीतील घटना, चिमुकल्यांचे मातृत्व हरवलेविक्रेते म्हणतात, “ग्राहकांचा उत्साह पाहून आम्ही नवीन उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. यावर्षी लोक पारंपरिकतेसोबत आधुनिकतेलाही पसंती देत आहेत.” दिवाळीच्या स्वागतासाठी शहरातील प्रत्येक कोपरा उजळून निघाल्याचे चित्र सध्या नांदेड बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
— शुभम ठाकूर, व्यावसायिक