Truth behind Virat Kohli Pakistani fan autograph : भारतीय संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि तेथे सर्वांचे लक्ष विराट कोहली व रोहित शर्मा या दोन स्टार्सकडे लागून राहिले आहे. ३६ वर्षीय विराट व ३७ वर्षीय रोहित यांची ही शेवटची वन डे मालिका असेल अशी चर्चा आहे. पण, या दोघांना २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही आशा करतो की हे दोघं चांगली कामगिरी करून दाखवतील, असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे तर या दौऱ्याची तीव्रता आणखी वाढली आहे. विराटला पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियात चाहत्यांचा गराडा झाल्याचे पाहायला मिळतेय. विराटही चाहत्यांना ऑटोग्राफ देत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली होती. पहलगाम हल्ल्यानंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर आले होते आणि भारताने त्यांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात मुद्दाम भारताला डिवचले, परंतु भारताने आशिया चषकाच्या तिन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले.
Virat Kohli : मोठी अपडेट्स : विराटने 'Cryptic Post' लिहिली, BCCI ने २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये 'त्याच्या' खेळण्यावर निर्णय घेऊन टाकलाफायनल जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पण, विराटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यात तो एका चाहत्याला पाकिस्तानी झेंड्यावर ऑटोग्राफ देताना दिसतोय. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमिवर हा व्हिडीओ वादाला फोडणी देणारा ठरतोय.
FACT CHECK - विराट कोहलीचा व्हायरल होणारा व्हिडीओ चुकीचा असल्याचे 'सकाळ' ने केलेल्या फॅक्ट चेक तपासात समोर आले. विराटने चाहत्याला RCB च्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला आहे. त्याच्या या खऱ्या फोटोशी छेडछाड करून RCB च्या जर्सीच्या जागी पाकिस्तानचा झेंडा टाकल्याचे दिसतेय.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५४.४६ च्या सरासरीने २४५१ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियात त्याने २९ सामन्यांत ५१.०३ च्या सरासरीने १३२७ धावा केल्या आहेत.