मुकेश अंबानींकडून ग्राहकांना 2% मोफत सोन्याची ऑफर; तुम्हाला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? जाणून घ्या

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत Jio Financial Services ने ग्राहकांसाठी 'Jio Gold 24K Days' ही खास मोहिम सुरू केली आहे. या मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये ग्राहकांना डिजिटल सोने खरेदीवर खात्रीशीर बक्षिसे आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.
ऑफरचा कालावधी आणि पात्रताही ऑफर 18 ऑक्टोबर (शनिवार) 2025 पासून सुरू झाली असून ती 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत वैध असेल. ग्राहक त्यांच्या Android आणि iOS उपकरणांवरील JioFinance किंवा MyJio ॲपद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
2% अतिरिक्त सोनं मोफतज्या ग्राहकांनी 2,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे Digital Gold खरेदी केले आहे, त्यांना एकूण खरेदी मूल्याच्या 2% अतिरिक्त गोल्ड मोफत मिळणार आहे. हे मोफत गोल्ड खरेदी केल्यानंतर 72 तासांच्या आत ग्राहकांच्या गोल्ड वॉलेटमध्ये जमा केले जाईल.
10 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेजे ग्राहक 20,000 किंवा त्याहून अधिक किमतीचे गोल्ड खरेदी करतील, ते आपोआप 'Jio Gold Mega Prize Draw' साठी पात्र ठरतील. या सोडतीमध्ये एकूण 10 लाख रुपये किमतीची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या बक्षिसांमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, सोन्याची नाणी, मिक्सर ग्राइंडर आणि शॉपिंग व्हाउचर यांचा समावेश आहे. विजेत्यांची निवड पारदर्शक पद्धतीने सोडत काढून केली जाईल आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी ईमेल व SMS द्वारे त्यांना सूचित केले जाईल.
JioFinance च्या माध्यमातून ग्राहक अगदी 10 रुपयांपासूनही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात. हे प्लॅटफॉर्म 24K शुद्ध सोन्याची खात्री देते आणि खरेदी, सुरक्षितता तसेच विमोचन (redemption) अशा सर्व सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करते.
PhonePe ची धनत्रयोदशी ऑफरदरम्यान, डिजिटल पेमेंट क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या PhonePe ने देखील धनत्रयोदशीसाठी विशेष ऑफर आणली आहे. PhonePe ॲपवरून 2,000 किंवा त्याहून अधिक किमतीचे 24K डिजिटल सोने खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी 2% कॅशबॅक (जास्तीत जास्त 2,000 रु) ची घोषणा केली आहे. ही ऑफर फक्त 18 ऑक्टोबर 2025 या एका दिवसासाठी, सकाळी 12:00 ते रात्री 11:59 वाजेपर्यंत वैध असेल आणि प्रत्येक वापरकर्ता एकदाच तिचा लाभ घेऊ शकेल. PhonePe त्याचे गोल्ड MMTC-PAMP, SafeGold आणि Caratlane सारख्या विश्वसनीय भागीदारांकडून घेते, ज्यामुळे 99.99% शुद्धता आणि सुरक्षित साठवणुकीची हमी मिळते.