LIVE: निलेश घायवळ विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
Webdunia Marathi October 18, 2025 02:45 PM

Maharashtra Marathi Breaking News Live Today : सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या रील प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ याच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेशच्या विरोधात आतापर्यंत सात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या रील प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ याच्या विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेशच्या विरोधात आतापर्यंत सात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.सविस्तर वाचा...

कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीर तालुक्यातील कात्यायनी भागात वेश्याव्यवसायाच्या संशयावरून अटक केलेल्या सहा महिला नर्तकांनी महिला सुधारगृहात सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने स्वच्छता कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून कामगारांनी संप मागे घेतला आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत कार्यरत गटार सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.