नाशिक: दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, एमआयडीसी व बाजार समित्यांना शनिवार (ता. १८)पासून आठ दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. बँका मात्र फक्त मंगळवार (ता. २१) आणि बुधवार (ता. २२) या दोनच दिवस बंद राहणार आहेत. शाळांना शुक्रवार (ता. १७)पासूनच सुट्या लागल्याने लहान गावांकडे जाण्याची लगबग सुरू झाली आहे.
दिवाळी म्हटले, की सुट्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. यंदा लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज सलग आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्यांचा आनंद लुटता येणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अतिरिक्त सुट्यांमुळे प्रत्यक्ष शासकीय कामकाज २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
एमआयडीसी
सातपूर आणि अंबड एमआयडीसीत १८ ते २४ ऑक्टोपर्यंत सुट्या राहणार असून, त्यानंतर शनिवारी व रविवारी सुट्या असल्याने कामगारांना संपूर्ण आठवडा विश्रांती मिळणार आहे.
बँका
दिवाळीच्या खरेदीमुळे बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, शासकीय बँकांना फक्त मंगळवार (ता. २१) आणि बुधवार (ता. २२) हे दोन दिवसच सुटी राहणार आहे.
बाजार समित्या
लासलगाव बाजार समितीने १७ ते २४ ऑक्टोबरपर्यंत कांद्याचे लिलाव बंद ठेवले असून, धान्याचे लिलाव २७ ऑक्टोबरपासून सुरू होतील. निफाडसह इतर प्रमुख बाजार समित्यांनीही १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान लिलाव बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.
Wardha News: वणीतील शेतकऱ्यांचे सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान; सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे लाखो हेक्टर पिकांचे नाशखासगी आस्थापना
खासगी कार्यालयांनीही दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन केले असून, काही ठिकाणी आठ दिवस, तर काही ठिकाणी दिवाळीनंतर सुट्या दिल्या जाणार आहेत. वाहन शोरूम, इलेक्ट्रॉनिक दुकाने व मॉलमध्ये मात्र ‘फेस्टिव्हल सीझन’ पूर्ण केल्यानंतरच सुटी दिली जाणार आहे. बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.