मुंडे महाविद्यालयात स्वच्छता मोहीम
मंडणगड, ता. १७ ः केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमेचा समारोप लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात झाला. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) विभाग व विस्तार विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्याने ‘आपला परिसर स्वच्छ परिसर’ या विषयावर आधारित भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर यांच्या हस्ते झाले. या वेळी कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, संचालक आदेश मर्चंडे, वैभव कोकाटे, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये आदी उपस्थित होते. या मोहिमेत महाविद्यालयाच्यावतीने बसस्थानक स्वच्छता, भित्तिपत्रक प्रकाशन, निबंध स्पर्धा, डॉ. व्ही. एम. पातंगे यांचे ऑनलाइन व्याख्यान, महाविद्यालय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण तसेच स्वच्छतेची शपथ यासारखे विविध उपक्रम घेऊन ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्यात आला.