-rat१६p१९.jpg-
२५N९८९५५
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव सुमीत पाध्ये याचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर.
------------
गोगटे महाविद्यालयाच्या विद्यार्थी
सचिवपदी सुमीत पाध्येची निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यासाठी विद्यार्थी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत सुमीत पाध्ये याने विजय मिळवला व तो विद्यार्थी सचिव झाला. याबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्याचे अभिनंदन केले. पाध्ये तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे. मतदान झाल्यानंतर सर्वाधिक मते मिळाल्याने त्याची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आनंद आंबेकर यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी डॉ. अश्विनी देवस्थळी, प्रा. अमोल सहस्रबुद्धे , प्रा. अंकित सुर्वे यांनी सहकार्य केले. सुमीत पाध्ये याचे अभिनंदन करण्यासाठी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या.
---
---