तेल्हारा (अकोला) : तालुक्यातील ग्राम भांबेरी येथील रहिवाशी ४० वर्षीय निखिल सुरेश भटकर या मद्यपी मुलाने, सोमवार दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री वडिलांना दारू पिण्यास पैसे (Telhara Assault Case) मागितले. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने वडिलांच्या मनगटावर चावा घेऊन जखमी केल्याची घटना रात्री ८ वाजेदरम्यान घडली.
फिर्यादी गीता सुरेशराव भटकर वय ६६ वर्षे, रा. भांबेरी, ता. तेल्हारा यांच्या तक्रारीवरुन व वैद्यकीय अहवालावरून तेल्हारा पोलिसांनी दि.१४ ऑक्टोबर रोजी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे. फिर्यादीचा मुलगा निखिल भटकर याने दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादीच्या पतीस दारू पिण्यास पैसे मागितले.
कॉलेजमध्येच धक्कादायक प्रकार; शौचालयात नेऊन विद्यार्थिनीवर अत्याचार, वर्गमित्राकडूनच कृत्य, गर्भपाताच्या गोळीचीही केली विचारणाफिर्यादीच्या पतीने व फिर्यादीने त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीच्या पतीस डोळ्यावर थापड मारली व उजव्या हाताच्या मनगटावर चावा घेऊन जखमी केले आणि त्याच्या पत्नीस सुद्धा लोटून दिले शिवाय जीवाने मारण्याची धमकी देऊन शिविगाळ केली, अशा आशयाच्या फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून तेल्हारा पोलिसांनी नमूद मद्यपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.